Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहायक पोलिस उपनिरीक्षक सापडला लाच घेतांना रंगेहाथ

राहुरीत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई

देवळाली प्रवरा ः राहुरी पोलिस ठाण्यातील डिबी पथकाचे प्रमुख  सहायक पोलिस उपनिरीक्षक  ज्ञानदेव नारायण गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथक

महालक्ष्मी’ हॉस्पिटलमधील आयसीयु सेंटरने मिळणार जीवदान : डॉ.तोरडमल
ढवळपुरी आश्रमशाळेच्या खेळाडूंची दिल्लीतही विजयी पताका.
मंदिरातील तीन दानपेटया चोरट्यांनी फोडल्या

देवळाली प्रवरा ः राहुरी पोलिस ठाण्यातील डिबी पथकाचे प्रमुख  सहायक पोलिस उपनिरीक्षक  ज्ञानदेव नारायण गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाईन शॉपमधून दारू घेऊन जाणार्‍या ग्राहकांना न अडविण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना साहय्यक पोलिस उपनिरीक्षक पोलिस गर्जे चतुर्भुज झाला. राहुरी पोलिस ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या कारवाईच्या नावाखाली गुन्हेगार नसलेल्या तरुणांना गुन्ह्यात अडकवून  गुन्हेगारीतून नाव गायब करण्यासाठी तरुणांच्या घरच्यां बरोबर लाखो रुपयांच्या तडजोडी सुरू असल्याची चर्चा होत आहे. विजपंप चोरीच्या गुन्ह्यात काहींचा संबध नसतानाही गुन्ह्यात गोवले गेले आहे.खरे गुन्हेगारांना पाठीशी घालुन चांगल्या घरातील तरुणांची नावे राहुरी पोलिसांच्या डिबी पथकाने गुन्ह्यात नावे घेतली आहेत. विजपंप चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींनाच मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात गोवण्यात आले.खरे मोटारसायकल चोरां बरोबर मोठी आर्थिक तडजोड करुन त्यांना मोकळे सोडण्यात आले आहे.देवळाली प्रवरात दोन हजाराच्या माव्यासाठी सव्वालाखाची तडजोड झाल्याची सध्या चर्चा सुरु आहे.तर विजपंप चोरीत आदीवासी महिलेकडून पन्रानास हजार रुपये घेण्यात आले.तरी ही त्या आदीवासी तरुणाला विजपंप व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अडकले गेले असल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात केली जात आहे.या घटनामुळे राहुरी पोलिसांचे डिबी पथक चांगलेच चर्चेत आले आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल मंगळवारी (दि. 5) रोजी राञी अचानकपणे छापा घातला. तक्रारदार वाईन शॉप चालकाच्या दुकानात येणार्‍या ग्राहकांना न अडविण्यासाठी  सहायक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नारायण गर्जे यांनी 20 हजार रुपयांची लाचेची  मागणी केली. तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना वाईन शॉपमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक  ज्ञानदेव नारायण गर्जे याला रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत विभागाची कारवाई सुरु होती.राञी उशिरा राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक येथिल लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी,पोलीस उप अधीक्षक यांचे वाचक  नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलिमा केशव डोळस, पोलिस नाईक संदीप हांडगे,पोलिस शिपाई सुरेश चव्हाण आदींनी हि कारवाई केली.

COMMENTS