Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहायक कामगार आयुक्ताला ’सीबीआय’कडून अटक

नागपूर : नागपुरातील सहायक कामगार आयुक्त विनयकुमार जैस्वाल यांना ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली. तीस हजारांची लाच घेताना

राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी कार्यकर्ते सरसावलेय; किनवट मध्ये राष्ट्रवादी पुन्हा
डोंगरावरुन कोसळलेला मोठा दगड दुचाकीवर पडला , पाहा आगळावेगळा अपघात
डॉ. प्रतिभा जाधव यांना मसापचा पुरस्कार जाहीर

नागपूर : नागपुरातील सहायक कामगार आयुक्त विनयकुमार जैस्वाल यांना ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी अटक केली. तीस हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. नागपुरातील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. वेस्टर्न कोल फिल्डमधून (वेकोलि) निवृत्त झालेल्या दोन कर्मचार्‍यांनी यासंदर्भात ‘सीबीआय’कडे तक्रार केली होती. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी 13 मार्च रोजी ‘सीबीआय’कडे तक्रार दिली. त्यानंतर काही तासांच्या आतच तक्रारीबाबत प्राथमिक चौकशी करण्यात आली व सापळा रचून कारवाईदेखील करण्यात आली.
तक्रारदार दोन्ही कर्मचारी 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी सरकारी निवासस्थान रिकामे न केल्याने ‘ग्रॅच्युईटी’ची रक्कम थकीत होती. संबंधित रक्कम वेकोलीने कामगार आयुक्त कार्यालयाकडे वर्ग केली. हे प्रकरण जैस्वाल यांच्याकडे होते. कर्मचार्‍यांनी वेकोलीकडून ‘एनओसी’ आणल्याने त्यांना ‘ग्रॅच्युईटी’ची रक्कम द्यावी, असे वेकोलीने कामगार आयुक्त कार्यालयाला कळविले. मात्र, ‘ग्रॅच्युईटी’ची रक्कम पाहिजे असेल तर प्रत्येकी 30 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी जैस्वालने या कर्मचार्‍यांकडे केली होती. कर्मचार्‍यांनी इतके पैसे देणे शक्य नसल्याचे म्हटल्यावर प्रत्येकी 15 हजार रुपये देण्याचे ठरले. जैस्वालने ही रक्कम ‘युपीआय’च्या माध्यमातून मागितली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने कर्मचार्‍यांनी ‘सीबीआय’कडे तक्रार केली. ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले. त्यानंतर सापळा रचून लाच स्वीकारताना जैस्वाल यांना अटक करण्यात आली. जैस्वाल यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या पदावरील अधिकार्‍यावर कारवाई झाल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. सीबीआयचे नागपूर प्रमुख व डीआयजी एम. एस. खान यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई झाली असून, उपअधीक्षक दिनेश तळपे हे पुढील तपास करत आहेत. या कारवाईनंतर ‘सीबीआय’ने जैस्वाल यांच्या निवासस्थानाची तसेच कार्यालयाचीही सखोल तपासणी केली. त्यात काही महत्वपूर्ण दस्तऐवज हाती लागले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

COMMENTS