Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे सुरु करावी शिवसेनेचे रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे यांना निवेदन

नगर- नगर-आष्टी रेल्वे ऐवजी आष्टी-नगर-पुणे-मुंबई अशी रेल्वे शटल एक्सप्रेस सुरु करण्यात यावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री ना.रावसाहेब

नगरमध्ये पेट्रोल भावाचा भडका, 119 रुपये व डिझेल 101 रुपये
नव्या सरकारमध्ये नगरमधून कोणाला मंत्रीपदाची लॉटरी?
निर्मलसरिता पुस्तकाने संगमनेरच्या साहित्य संस्कृतीत भर ः आ.थोरात

नगर- नगर-आष्टी रेल्वे ऐवजी आष्टी-नगर-पुणे-मुंबई अशी रेल्वे शटल एक्सप्रेस सुरु करण्यात यावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री ना.रावसाहेब दानवे यांना शिवसेनेच्यावतीने देण्यात आले. याप्रसंगी युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, युवा सेना जिल्हाध्यक्ष रवि वाकळे, उपशहरप्रमुख संदिप दातरंगे, अभिजित अष्टेकर, मुन्ना भिंगारदिवे, मंदार मुळे, साहिर शेख, अक्षय नागापुरे आदि उपस्थित होते. ना.रावसाहेब दानवे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड, परळी, उस्मानाबाद सह मराठवाड्याचे भाग्य उजळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महतप्रयासाने आष्टी-नगर रेल्वे सुरु केली. मात्र या रेल्वेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता या रेल्वेचा फ्लॉप शो झाला आहे. प्रत्यक्षात ही रेल्वे आष्टी-नगर-दौंड कॉडलाईन ते पुणे आणि पुढे मुंबई अशी धावायला हवी होती.   मात्र आपणास नगरस्थित रेल्वे कर्मचार्‍यांचे ड्युटीचे तास पूर्ण व्हावेत आणि त्यांना परत नगर मुक्कामी येता यावे या  उद्देशाने आपल्या अधिकार्‍यांनी ही रेल्वे सकाळी नगरहून आष्टीला सोडली आणि ती दुपारी 2 पर्यंत परत नगरला आणली.  आता याची दुसरी फेरी दुपारी परत नगरहून आष्टीकडे सोडण्यात येणार आहे. आणि सायंकाळी आष्टीहून निघून ती नगरला आणण्यात येणार आहे. पण यापुर्वी सुरु केलेल्या प्रवाशांचा अतिशय अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. तरी देखील या फ्लॉप शो चा रिपिट टेलिकास्ट करण्याचा घाट रेल्वे खाते का घालत आहे, याचा उलगडा होत नाही.

     नगर-आष्टी ही रेल्वे चालविण्यासाठी दररोज 80 हजार रुपयांचे डिझेल लागते, पण तिकिटे फक्त 100 ते 150 विकली जातात मग ही द्राविडी प्राणायम कशासाठी? ही रेल्वे जर आष्टी-नगर-दौंड-पुणे-मुंबई अशी सुरु झाली आणि ती जर सायंकाळी आष्टीहून निघाली आणि पहाटे मुंबईत पोहोचली तर त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळेल. आज बीड, आष्टी, जामखेड आणि नगरहून हजारो विद्यार्थी, कर्मचारी, कामगार वर्ग दररोज रस्ता मार्गाने खस्ता खात पुणे-मुंबईला एस.टी., खाजगी ट्रॅव्हल्सने जात आहे. त्यामुळे आष्टी-नगर-दौंड-पुणे-मुंबई अशी थेट रेल्वे सुरु झाल्यास सर्वांची सोय तर होईलच, त्याचबरोबर नवीन विकास पर्व निर्माण होईल. पुण्याला थेट रेल्वे सुरु झाल्यास वेळ आणि पैशांचा अपव्यय होणार नाही. नगर-पुणे रेल्वे मार्गावर कॉडलाईन टाकण्यात आल्याने आणि या मार्गाचे विद्युतीकरण देखील पूर्ण झाल्याने नगर-पुणे हा रेल्वे प्रवास अवघ्या अडीच तासांवर आला आहे. त्यामुळे आष्टी-नगर-दौंड-पुणे-मुंबई अशी रेल्वे सुरु करण्यात आली तर रेल्वे आणि प्रासी अशा दोघांच्याही दृष्टीने फायद्याचे ठरेल.  त्यामुळे लवकरात लवकर हा रेल्वे रुट चालू करावा, अशी मागणीही केली आहे.

COMMENTS