Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्‍वास कारखान्याच्या अध्यक्ष पदी आ. मानसिंगराव नाईक; उपाध्यक्षपदी माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर

इस्लामपूर / प्रतिनिधी : विश्‍वासराव नाईक सहकारी साखर कारखानाच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत आ. मानसिंगराव नाईक व माजी आमदार बाबासाहेब पाटील-सर

महाधन क्रॉपटेकच्या सहाय्याने  कांदा उत्पादनात  १५ ते २० टक्क्यांनी वाढ 
सांगवी पाटण येथील शेतकर्‍यांचे अवकाळी पावसामुळे झाले नुकसान…
कृषिमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

इस्लामपूर / प्रतिनिधी : विश्‍वासराव नाईक सहकारी साखर कारखानाच्या संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत आ. मानसिंगराव नाईक व माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांची सलग पाचव्यांदा अनुक्रमे अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दोनच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी अध्यक्षपदी आ. मानसिंगराव नाईक यांची तर, उपाध्यक्षपदी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी निवड झाल्याचे जाहिर केले. त्यांनी नूतन अध्यक्ष, उपध्यक्षांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यानंतर विश्‍वास कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया झाल्याबद्दल संचालक मंडळातर्फे प्रांताधिकारी खिलारी, तहसीलदार गणेश शिंदे व सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक डी. एस. खताळ यांचा आ. नाईक व उपाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ. नाईक यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर निवडीचा कार्यक्रम झाला.
यानंतर नूतन अध्यक्ष, आ. नाईक, उपाध्यक्ष माजी आमदार पाटील यांचा कामगार संघटनेतर्फे शाल, फेटा व पुष्पहार देवून सत्कार झाला. संचालक विराज नाईक, सुरेश पाटील, विश्‍वास कदम, हंबीरराव पाटील, विष्णू पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील, बिरुदेव आंबरे, डॉ. राजाराम पाटील, यशवंतर दळवी, यशवंत निकम, बाबासाहेब पाटील, सुहास पाटील, संदिप तडाखे, तुकाराम पाटील, कोमल पाटील, अनिता चौगुले, अ‍ॅड. अजित पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास माजी आमदार सत्यजीत पाटील, दिनकरराव पाटील, शिवाजीराव घोडे-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, मानसिंग पाटील, फत्तेसिंगराव नाईक दुध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, तालुक्याचे माजी सभापती व विद्यमान सदस्य सम्राटसिंग नाईक, सुतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, कारखान्याचे सचिव सचिन पाटील, शिराळ्याचे माजी सरपंच प्रमोद नाईक, विवेक नाईक, शाहू नाईक, तानाजी वनारे, तालुक्याच्या सभापती मनिषाताई गुरव, उपसभापती बी. के. नायकवडी, अशोकराव पाटील, बाबासाहेब पवार, महादेव कदम, अजय जाधव, टी. एम. साळुखे, विजय पाटील, दत्तात्रय पाटील, विजयराव देशमुख उपस्थित होते. नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाने लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या कारखाना स्थळावरील स्मृतीस्थळी भेट देवून त्यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पन करून अभिवादन केले.

COMMENTS