Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारा घसरल्याने महाराष्ट्र गारठला

अहमदनगर जिल्ह्यात पारा 12 अंशावर

पुणे ः राज्यात गेल्या काही तासांपासून चांगलाच गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळी अनेक जिल्ह्यात थंडीने उच्चांक गाठल्यामुळे महाराष्ट्र र

विदेशात घुसखोरी आणि स्थलांतर! 
सीमाप्रश्‍नी कर्नाटकी पोलिसांची दडपशाही
निपमची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पुणे ः राज्यात गेल्या काही तासांपासून चांगलाच गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळी अनेक जिल्ह्यात थंडीने उच्चांक गाठल्यामुळे महाराष्ट्र राज्य चांगलेच गारठल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी प्रथमच तापमानाने नीचांकी पातळीवर आल्याचे दिसून येत आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 11 अंश तापमानाची नोंद झाली. पुणे, नाशिक, अहमदनगरमध्ये पारा 12 अंशांवर होता. तर पुढील तीन दिवस किमान तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.
नगर जिल्ह्यातील जेऊर येथे 10.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर निफाड 11, नाशिक 12, अहमदनगर 12, संभाजीनगर 13.4, परभणी 13, महाबळेश्‍वर 13, पुणे 14, बीड 14, जालना 14, नांदेड 14, जळगाव 14, अकोला 14 अशी तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे व थंड आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वार्‍यांचा वेग कमी झाला तरी नैऋत्य बंगाल खाडीत विषुववृत्ताजवळ चक्राकार वारे आहेत. परिणामी कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. दरम्यान थंडी आणि धुक्यामुळे उत्तर भारतातून भुसावळ, मुंबई, पुणेकडे येणार्‍या 11 गाड्या विलंबाने धावत आहेत. उत्तर भारतातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पसरली आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीच्या अनेक भागात किमान तापमान 4 ते 8 अंशांच्या दरम्यान आहे. तर पंजाबमधील अमृतसर आणि लुधियाना येथे देशातील नीचांकी 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यातच राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाले आहे.

COMMENTS