विखे यांना मंत्रिपद मिळताच पाथर्डीत जल्लोष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विखे यांना मंत्रिपद मिळताच पाथर्डीत जल्लोष

पाथर्डी/प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर अखेर तीस द

नवरात्रोत्सवात भाविकांना ई पास उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम
जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज – प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा
जिल्हाधिकाऱ्यांचे धडक कारवाईमुळे पाथर्डीतील सहा दुकानाला लागले सील

पाथर्डी/प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर अखेर तीस दिवसानंतर मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला.त्या मंत्रिमंडळात अहमदनगर जिल्ह्यातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी समावेश झाल्याने विखे यांच्या कार्यकर्त्याच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला.
पाथर्डी शहरात मंगळवारी सकाळी विखे मंत्री पदाची शपथ घेताच विखे यांचे खंदे समर्थक तथा माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत शहरातील नाईक चौकात फटाके फोडत जल्लोष साजरा केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष मृत्यूजय गर्जे,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,किशोर परदेशी,बबन सबलस,सुभाष बोरुडे,प्रतीक नांगरे आदी जण उपस्थित होते.Attachments area

COMMENTS