एका वर्षात तब्बल 8 हजार श्रीमंतांनी सोडला देश

Homeताज्या बातम्यादेश

एका वर्षात तब्बल 8 हजार श्रीमंतांनी सोडला देश

जगातील 88 हजार अब्बाधीशांनी सोडला आपला देश

नवी दिल्ली प्रतिनिधी - देश सोडून इतर देशात स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत असून, भारतात यंदा एका वर्षांत तब्बल 8 हजार अब्जाधीशांनी देश सोडून इतर देशा

उपसरपंच लहु शिराळे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुलीसाठी पोलिस सरंक्षण द्या
तारक मेहता का उल्टा चश्मा फेम बबीताचा अपघात; चालणंही झालं मुश्किल

नवी दिल्ली प्रतिनिधी – देश सोडून इतर देशात स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत असून, भारतात यंदा एका वर्षांत तब्बल 8 हजार अब्जाधीशांनी देश सोडून इतर देशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील 8 हजार तर, चीनमधील सर्वाधिक 15 हजार तर, रशियातून 10 हजार अब्जाधीशांनी देश सोडला आहे. तर जगभरातील एकूण 88 हजार अब्जाधीशांनी आपला मूळ देश सोडत, इतर देशांत स्थायिक होण्याला प्राधान्य दिले आहे.
आपल्या मूळ देशातून इतर विकसित देशात स्थायिक होण्याचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे. यामागे जगभरात निर्माण होणारे अनिश्‍चितेचे वातावरण प्रमुख कारण असल्याचे बोलले जातआहे. कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर विविध देशातील स्थलांतरित अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली आहे. ब्रिटेनची इन्वेस्टमेंट मायग्रेशन कंन्स्लटन्सी कंपनी हेनले अँड पार्टर्नरच्या ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षात जगभरातील अंदाजे 88 हजार अब्जाधीशांनी देश सोडला. जगभरात भारत हा तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे, जिथे 8 हजार अब्जाधीशांनी देश सोडला आहे. चीनमधून अंदाजे 15 हजार तर रशियामधून 10 हजार लोकांनी पलायन केले आहेत.भारताच्या नंतर हाँगकाँग चौथ्या आणि युक्रेन पाचव्या क्रमांकावर आहेत. हाँगकाँगच्या तीन हजार आणि युक्रेनमधील 2800 कोट्यधीशांनी आपला देश सोडला आहे. ब्रिटेनमधील 1500 कोट्यवधींनी देश सोडला आहे. हेनलेच्या नुसार, अतिश्रीमंत (हाय नेटवर्थ इंडिव्हिज्यूअल्स) लोकांची संपत्ती ही अंदाजे 10 लाख डॉलर्स अथवा त्यापेक्षा अधिक असते. भारतात अंदाजे 3.57 लाख अब्जाधीश, कोट्याधीश आहेत. त्यातील अंदाजे 2 टक्के अब्जाधीशांनी आतापर्यंत भारत सोडला आहे. भारतातील व्यवसायाभिमुख योजनांमुळे अब्जाधीशांनी भारतातच राहणे अधिक पसंत केले आहे. किंबहुना 20230 पर्यंत देशातील अब्जाधीशांची संख्या 80 टक्के वाढण्याची शक्यता आहे.

सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युएई या देशांना प्राधान्य – आपला देश सोडून जाणार्‍या अब्जाधीशांनी युएई, आँस्ट्रेलिया, सिंगापूर य देशांमध्ये वास्तव्य करण्यास अधिक पसंती दिली आहे. या वर्षभरात जगभरात आपला देश सोडून जाणार्‍या अब्जाधीशांमध्ये 4 हजार जणांनी दुबई, 3500 जणांनी आँस्ट्रेलिया, 2800 जणांनी सिंगापूर येथे स्थलांतर केले आहे. तर काही लोकांनी मेक्सिको, ब्रिटन, इंडोनेशियासह इतर शहरांमध्ये जीवन व्यतित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दशकांमध्ये अंदाजे 80 हजारांपेक्षा अधिक अब्जाधीश आँस्ट्रेलियात स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरित झालेल्या देशांच्या यादीत सिंगापूर हे त्यांच्या अधिक पसंतीचा देश बनला आहे. कारण या देशात व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले जाते.

COMMENTS