जळगाव/प्रतिनिधी ः जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतांना
जळगाव/प्रतिनिधी ः जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतांना जालियनवाला हत्याकांड घडले तसेच जालनावाला घडल्याची घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरे करत आहेत. जनतेशी संवादाबरोबरच शेतकर्यांशी देखील संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर सभेत त्यांनी भाजपसह शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, काही लोकांच्या डोक्यात हवा गेली. त्या हवेच्या जोरावर हे फुग्यासारखे हवेत गेले आहेत. त्या फुग्यांना टाचणी लावण्याचे काम तुम्हा सर्वांना करायचे आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता आली काय गेली काय? मी सत्तेसाठी धडपडत नाही. देशाचे नेतृत्व करण्याची स्वप्न मला पडत नाही. जागे करण्याचे काम मला वंश परंपरेने आले असल्याचे ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, सातत्याने टीका करण्यात येते की, शिवसेनेची काँग्रेस होईल. 25 वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. तशीच काँग्रेससोबत जावून शिवसेनाची काँग्रेस होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा हिंदू खतरेमें अशा घोषणा देत होते. आता यांचे नऊ वर्षे सरकार आहे तरी यांना काश्मीरमधील हिंदू पंडितांना परत आणता आले नाही. आता तर यांना यांचे सरकार नव वर्षे असतांना हिंदू आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे, हे दुर्देव असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आंदोलनात मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत त्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे. असा अमानुष अत्याचार जालियनवाला येथे झाला होता आता नवा जालनावाला घडविला आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, जळगावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर तिखट भाषेत टीका केली आहे. आम्ही आमची काँग्रेस होऊ देणार नाहीच, पण भाजपा कमळाबाईची पालखी देखील वाहणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भाजपने सरदार पटेल यांचा पुतळा उभारला. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना चोरले. अगदी माझे वडील देखील त्यांनी चोरले. भाजप आणि संघाला आदर्श व्यक्ती उभे करता आले नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
‘पोलादी’ नव्हे तर ‘तकलादू’ पुरुष – केंद्रातील भाजप सरकार आता डगमगायला लागले आहे. मला माझ्या महापौर आणि उपमहापौरांसह इतर सहकार्याचा अभिमान आहे. पोलादी पुरूष केवळ नावाचे नाही तर कामाचे होते. त्यांनी आपल्या कर्तव्याने नाव उंचावले होते. काम करुन जनतेने एखादी उपाधी जनतेने द्यायची अशी तुरळक व्यक्तीपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जळगाव मनपाचे आभारही मानले आहे. ठाकरे म्हणाले की, सरदार पटेलांनी त्याकाळात आरएसएसवर बंदी देखील आणली होती. म्हणजे त्यांना देशप्रेम काय हे कळत होते, पुतळ्याची उंची ठीक आहे. कामाची उंची कधी गाठणार असा टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावा आहे. पटेलांनी अभिमानाने मराठवाडा स्वातंत्र करुन घेतला. जशी कारवाई सरदार पटेलांनी मराठवाड्यात केली तशी कारवाई करण्याची हिंमत यांच्यात मणिपूरमध्ये दिसली नाही. आणि स्वत: ला पोलादी पुरुष म्हणून घेताय. तुम्ही तकलादू पुरुष आहात अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
COMMENTS