जामखेड/प्रतिनिधी ः आपल्या अविर्भावात वाढवणारे. इतरांना किंमत न देता त्रास देणारयांना नव्हे तर मनापासून लोकांच्या हितासाठी काम करणारयांना देव पावत
जामखेड/प्रतिनिधी ः आपल्या अविर्भावात वाढवणारे. इतरांना किंमत न देता त्रास देणारयांना नव्हे तर मनापासून लोकांच्या हितासाठी काम करणारयांना देव पावतो. ईश्वरी चिठ्ठीने बाजार समितीच्या सभापतीपदी शरद कारले यांना बसवले. बाजार समिती शेतकर्यांच्या हितासाठीच भाजपाच्या ताब्यात दिली ही ईश्वरी चिठ्ठीतुन ईश्वराची कृपा आहे. सामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. जे गेली अडीच वर्षे अविर्भावात होते या निकालाने ते खालच्या पायरीवर आले असे आ प्रा राम शिंदे यांनी सांगितले. बाजार समितीच्या सभापतीपदाचे पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी नवनिर्वाचित सभापती शरद कारले यांनी आ राम शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात पदभार स्वीकारला. यावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, संदीप गायकवाड, बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक गौतम उतेकर, विष्णू भोंडवे, वैजीनाथ पाटील, सचिन घुमरे, डॉ. सिताराम ससाणे, नंदू गोरे, गणेश जगताप, रविंद्र हुलगुंडे, मोहन गडदे, भारत उगले, बापुराव ढवळे, पांडुरंग उबाळे, बाळूसेठ बोथरा,शहाजीराजे भोसले, बिट्टू मोरे, सोमनाथ राळेभात, गणेश लटके,अभिजित राळेभात,उध्दव हुलगुंडे, दिगांबर ढवळे,प्रवीण चोरडिया, डॉ अल्ताफ शेख, गोरख घनवट, बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद, किरण मोरे, रामभाऊ काशिद, बाळासाहेब यादव, भाजपा कार्यकर्ते, सरपंच, सोसायट्यांचे चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, हमाल, शेतकरी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी सभापती व सर्व नवनिर्वाचित संचालकांचा आ राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाजार समिती आदर्श करणार :शरद कारले- आ. प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा शेतकर्यांच्या हितासाठीच सभापतीपदाचा वापर करणार आहे.शेतकरी व व्यापारयांना मुलभुत सुविधा देण्यासाठी तसेच सर्व सहकारी संचालकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करत जिल्ह्यात आदर्श बाजार समिती करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
दहशतीचे नव्हे सहमतीचे राजकारण करतो : सचिन गायवळ – बाजार समितीच्या निवडणुक निकालात दोन्ही गटांना समान 9-9 जागा मिळाल्या. समोरच्या गटात माझ्या हक्काचे दोनजण माझ्या शब्दावर येण्यासाठी एका पायावर तयार होते. भाजपाच्या 11 जागा झाल्या असत्या मात्र मी तसे केले नाही. ते फूटले असते तर सचिन गायवळ सरांनी दहशत केली असा संदेश गेला असता. विरोधक आमच्या बाबत चुकीचा संदेश देतात. मात्र आम्ही गायवळ बंधू दहशतीचे नव्हे सहमतीचे काम करतो हे प्रत्येक कामातून दाखवून दिले आहे असे प्रा सचिन गायवळ यांनी सांगितले.
COMMENTS