Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी म्हणून अरविंद सावते सन्मानीत

भोकर प्रतिनिधी - महावितरण कंपनीने नेमून दिलेल्या कामानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रात विद्युत वाहिनीचे देखभाल करणे अचानक उद्भवणार्‍या तांत्रिक स्वर

नव तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपत्कालीन कार्य केंद्र अधिक सक्षम : मुख्यमंत्री फडणवीस
मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच
जळगावमध्ये कंटेनर उलटल्याने दोघांचा मृत्यू

भोकर प्रतिनिधी – महावितरण कंपनीने नेमून दिलेल्या कामानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रात विद्युत वाहिनीचे देखभाल करणे अचानक उद्भवणार्‍या तांत्रिक स्वरूपाच्या समस्येचे तातडीने निराकरण करणे त्याद्वारे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे ही कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेली कार्य तत्परता, कर्तव्यदक्षता, निष्ठा व समर्पित वृत्ती या गुणाचा गौरव म्हणून कामगार दिनी म्हणजेच 1 मे रोजी 2022-2023 करिता उत्कृष्ट तार मार्ग कर्मचारी म्हणून भोकर विभागांतर्गत कामगार दिनानिमित्त गुणवंत तांत्रिक कामगार म्हणून
 श्री.अरविंद किशनराव सावते (वरिष्ठ तंत्रज्ञ हिमायतनगर उपविभाग) यांचा प्रमाणपत्र ,सन्मानचिन्ह देऊन श्री.अनिल डोये.साहेब,(मुख्य अभियंता नांदेड)यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
 उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी म्हणून निवड झाल्याबद्दल श्री.तंबाखे साहेब (कार्यकारी अभियंता भोकर) हिमायतनगर उपविभागाचे  उपकार्यकारी अभियंता श्री नागेशजी लोणे साहेब व तसेच सरसम युनिटचे शाखा अभियंता श्री गिरीशजी दहे साहेब, साईनाथ कल्याणकर वरिष्ठ तंत्रज्ञ तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन सर्कल उपाध्यक्ष नांदेड) अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा  दिल्या. त्यांच्या कार्याबद्दल पत्रकार गंगाधर पडवळे यांच्या सह परिसरातील अनेक नागरिक, मित्रमंडळ यांनी शुभेच्छाचां वर्षाव केला.

COMMENTS