Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांना धमकी देणारा अटकेत

सागर बर्वेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी पुण्यातून एका तरुणाने दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

राज्यात आता पूर्वीसारखा सुसंवाद पाहायला मिळत नाही… शरद पवारांची खंत
19 हजार महिला बेपत्ता असतांना गप्प बसायचे का ?
शरद पवारांचे आता मिशन गोंदिया

मुंबई/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी पुण्यातून एका तरुणाने दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. पवारांना धमकी देणार्‍या तरूणाचे नाव सागर बर्वे (वय 32) असे आहे. नर्मदाबाई पटवर्धन या नावाचा वापर करून त्याने फेसबुक पेजवरून धमकी दिली होती. ’तुमची गत दाभोलकरांसारखी होईल’ अशा शब्दांत मागील आठवड्यांत शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. यामुळे खळबळ उडाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ नेत्यांसह मुंबई पोनिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली होती. तसेच, या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. शरद पवार यांना काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्यातील व केंद्रातील गृहमंत्र्यांची असेल असेही सुप्रिया सुळे यांनी बजावले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला होता. शरद पवारांना धमकी देणारी पोस्ट ज्या कम्प्युटरवरून अपलोड करण्यात आली होती, त्याचा आयपी अ‍ॅड्रेस सागर बर्वेशी संबंधित होता. याचा उलगडा होताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सागर बर्वे याला अटक केली. त्याला रविवारी एस्प्लेनेड कोर्टात हजर करण्यात आले. त्याला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सागर बर्वे हा आयटी प्रोफेशनल आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

COMMENTS