पुणे - पुण्यातील भाड्याच्या घरात बनावट नोटांची छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चौघांना जेरबंद केले आहे. पप्पू भारत पवार (रा. कंदर
पुणे – पुण्यातील भाड्याच्या घरात बनावट नोटांची छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चौघांना जेरबंद केले आहे. पप्पू भारत पवार (रा. कंदर, ता. करमाळा) याला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी पाचशे रुपयाच्या एक हजार 173 बनावट नोटा (पाच लाख 86 हजार 500 रुपये) जप्त केल्या आहेत. कुर्डुवाडी-टेंभूर्णी रोडवरील बालोद्यान चौकात बनावट नोटांची बॅग घेऊन आलेल्या हर्षल लोकरे याला गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडले. त्याच दिवशी पोलिसांनी सुभाष काळे यालाही जेरबंद केले. त्यांच्या चौकशीवेळी कुर्डुवाडीतील किरणा दुकानदार गणेश शिंदे याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पुण्यातील एका भाड्याच्या खोलीत नोटांची छपाई सुरु होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेथून पोलिसांनी नोटांची छपाई करणारी मशीन (प्रिंटर, संगणक व इतर साहित्य) जप्त केले. त्याचवेळी पोलिसांनी तेथे पाचशेच्या 100 बनावट नोटांचा बंडल आढळला. 593 नोटा जप्त केल्यानंतरही पोलिसांनी तपास सुरुच ठेवला. त्यानंतर या गुन्ह्यात आणखी एकाचे नाव समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पप्पू पवार याला अटक केली. त्याच्याकडील तब्बल 580 बनावट नोटा हस्तगत केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पोरे यांनी दिली.
COMMENTS