देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : मुस्लिम समाजाचे अंतिम प्रेषित यांचे विषयी अपमान जन्य वक्तव्य करणार्या नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांचे विरुद्ध सरकार तर्फे
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : मुस्लिम समाजाचे अंतिम प्रेषित यांचे विषयी अपमान जन्य वक्तव्य करणार्या नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांचे विरुद्ध सरकार तर्फे देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी या मागणी साठी देवळाली प्रवरा शहरात आज मुकमोर्चा काढून बाजारतळ प्रांगणात निषेध करुण राहुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदन देण्यात आले.
नुपूर शर्मा व नविन जिंदाल यांचा निषेध असो,त्यांना अटक करा अशा प्रकारचे फलक हातात घेतलेले शेकडो अबाल वृध्द या मुक मोर्चा मध्ये सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा बाजारतळ येथे आल्यानंतर निषेध सभा घेण्यात आली. रफीकभाई शेख, मौलाना अल्लाउद्दीन, मौलाना अबुबकर यांनी नुपूर शर्मा,नविन जिंदाल यांचे अटकेची मागणी करीत त्यांचे समर्थन करीत सोशल मीडियावरून तेढ निर्माण करणार्या विरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली.अजिजभाई शेख, अकीलबाबा पटेल,शकीलभाई शेख,मौलाना उमर,मौलना शेहेबाज,हाफिज सोहेल,अरफान सर,अब्बास सय्यद,सुभेदार शेख, अजिज तांबोळी, फिरोज शेख, अतिक शेख, मुश्ताक शेख, चांद अत्तार, आसिफ शेख, मन्सूर शेख, सलीम शेख, मोहसीन शेख, रियाज शेख, मुन्नाभाई शेख, बशीर पठाण, दानिश बागवान,अर्शद शेख,मुसाभाई शेख, शाकीर तांबोळी,नासीर तांबोळी, समद शेख,उमर इनामदार, समद शेख, तन्वीर इनामदार,आदिल इनामदार, अबिद शेख, डॉ. फिरोज शेख, इरफान शेख, याकूब शेख, अल्ताफ शेख,वसीम तांबोळी, आदी सह मुस्लिम समाजाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी निवेदन स्वीकारले, शिस्तबद्ध मुक मोर्चा बद्दल आभार मानले.पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील व त्यांचे सहाकार्यानी बंदोबस्त ठेवला.
मुस्लिम मोर्चास विविध संघटना पदाधिकार्यांचा पाठींबा
आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अधक्ष संतोष चोळके, शिवसेनेचे सुनील कराळे,कुमार भिंगारे,विजय कुमावत,उत्तम कडू,पप्पू बर्डे आदींनी या घटनेचा निषेध करून मोर्चास पाठिंबा दिला.
COMMENTS