Homeताज्या बातम्यादेश

दहशतवाद्यांकडून लष्कराच्या जवानाचे अपहरण

कुलगाम/प्रतिनिधी ः काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका जवानाचे अपहरण केले आहे. जावेद अहमद वानी असे या 25 वर्षीय जवानाचे नाव आहे.

पाकिस्तानात प्रथमच हिंदू महिला निवडणुकीच्या रिंगणात
जरे हत्याकांड प्रकरण वर्ग करण्यावर 16 डिसेंबरला सुनावणी
केंद्र सरकारचा 15 वित्त आयोगाचा 35 कोटींचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करा अन्यथा झेडपीत तीव्र स्वरूपाचे आंदोलनचे छेडू – मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले

कुलगाम/प्रतिनिधी ः काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका जवानाचे अपहरण केले आहे. जावेद अहमद वानी असे या 25 वर्षीय जवानाचे नाव आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी त्याचे त्याच्या कारमधून अपहरण केले. कारमध्ये रक्ताचे डागही सापडले आहेत. वानीची पोस्टिंग लेहमध्ये आहे. जावेदच्या पालकांनी दहशतवाद्यांना त्यांच्या मुलाला सोडण्याची विनंती केली आहे.
 तो मोहरमच्या सुट्टीसाठी घरी आला होता. वानी शनिवारी आपल्या कारने चहलगाम येथे जात होते. अनेक तास बेपत्ता राहिल्यानंतर गावातील लोकांनी त्याचा शोध सुरू केला. झडतीदरम्यान कुलगामजवळील प्रणाल येथून त्याची अनलॉक केलेली कार सापडली. कारमधून जवानाची चप्पल आणि रक्ताचे डाग आढळले आहेत. लष्कराचे पथक शोध मोहीम राबवत आहे. परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांच्या अपहरणाची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेकवेळा दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांचे अपहरण केले आहे. मे 2017 मध्येही दहशतवाद्यांनी सुट्टीसाठी घरी आलेल्या औरंगजेब या लष्करी अधिकार्‍याचे अपहरण केले होते. यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. औरंगदेब एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी हरमन परिसरात त्यांच्या घरापासून तीन किलोमीटर अंतरावर त्यांचा गोळ्यांनी चाळणी केलेला मृतदेह आढळून आला. याशिवाय शहीद लेफ्टनंट उमर फयाज आणि शहीद जवान इरफान अहमद दार यांनाही रजेवर घरी जात असताना दहशतवाद्यांनी ठार केले होते.

COMMENTS