Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीला अटक

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील विश्रांतवाडी चौक परिसरात सार्वजनिक रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांना अडवून शस्त्राचा धाक दाखवत, लुटमारी करणार्‍या टोळीला

विद्यार्थ्याने शिक्षेकेवर गोळी झाडली
केजरीवालांना 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी
डोक्यात स्टम्प घालून २६ वर्षीय कबड्डीपटूची हत्या.

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील विश्रांतवाडी चौक परिसरात सार्वजनिक रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांना अडवून शस्त्राचा धाक दाखवत, लुटमारी करणार्‍या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. झोमॅटो कंपनी डिलिव्हरी बॉय असलेल्या तरुणासह इतर वाहन चालकांना शस्त्राचा धाक दाखवून संबंधित टोळीने लुटल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी रोहित सदाफळे (वय-21), साहिल तिरूमल (वय-21, दोघे राहणार -येरवडा, पुणे) आणि विक्रम देवकुळे (वय-20, राहणार-बोपखेल, पुणे) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात सिद्धेश्‍वर कृष्णा सोळंके (वय-26, राहणार-वाघोली, पुणे) यांनी आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 17 जुलै रोजी उघडलेला आहे.तक्रारदार सिद्धेश्‍वर सोळंके झोमॅटो कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी झोमॅटोची ऑर्डर देऊन परत येत असताना, त्यांना संबंधित आरोपींनी अडवले. त्यानंतर त्यांची मोटरसायकल थांबवून आरोपींनी त्यांच्याकडे धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या पाठीवरील बॅगमधून रोख पंधराशे रुपये ,आधार कार्ड, पॅन कार्ड ,मतदान कार्ड व लर्निंग लायसन अशी कागदपत्रे जबरदस्तीने देऊन ते पसार झाले पुढे संबंधित आरोपींनी अन्य दोन मोटरसायकल चालक व एक रिक्षाचालक या गाडी चालकांना धारदार शास्त्राचा धाक दाखवून संबंधित गाड्यांची तोडफोड करून, नुकसान करत आरडाओरोड करून शांतीनगर भागात दहशत निर्माण केली आहे.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस शेख पुढील तपास करत आहेत. आंबेगाव परिसरात राहणारा रोशन नवले (वय-21) व त्याचा मित्र अर्जुन बेलेदरे (वय-21) असे आंबेगाव याठिकाणी एका भाजीच्या स्टॉलवर उभे होते. त्यावेळी आरोपी ऋषिकेश सांगदेव गोटे (वय 23 ,राहणार-धनकवडी ,पुणे) हा त्याच्यासोबत तीन मोटरसायकलवर चार ते पाच मुले हातात लोखंडी धारदार शस्त्र घेऊन संबंधित ठिकाणी आले. त्यांनी अर्जुन यास जुन्या भांडण्याच्या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या हातातील धारदार लोखंडी हत्यार यानी अर्जुनच्या तोंडावर ,पाठीवर डोक्यात, पायावर व पोटावर वार करून त्याच गंभीर जखमी केले. तसेच ’ तू सर्वांचा भाई आहेस, तुला आता जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून शिवीगाळ करत त्याला गंभीर जखमी करून आरोपी पसार झाले आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश गोटे याला अटक केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध भारती विद्यापीठ पोलिस घेत आहेत.

COMMENTS