Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कानडगाव येथे सशस्त्र दरोडा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील विक्रम संजय मोताळे यांच्या घरात काल रात्रीच्या दरम्यान सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा

लाडक्या शेवंताचा क्लासी अवतार | फिल्मी मसाला | LokNews24 |
पारवा पकडण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू
चोरट्यांचा आता शेतातील पिकांवर डोळा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील विक्रम संजय मोताळे यांच्या घरात काल रात्रीच्या दरम्यान सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. गावठी कट्टा व तलवारीचा धाक दाखवून संजय मोताळे यांना मारहाण करून सोन्याचे दागीने व मोबाईल लुटून नेला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विक्रम संजय मोताळे हे राहुरी तालूक्यातील कानडगाव येथील जाणता चौकात राहत आहेत.
17 मे 2023 रोजी 12 वाजे दरम्यान विक्रम मोताळे हे त्यांच्या घराच्या बाहेर झोपले होते. त्यावेळी तोंडाला रूमाल बांधून आलेल्या सहा दरोडेखोरांनी विक्रम मोताळे यांना उठवून मारहाण केली. गावठी कट्टा व तलवारीचा धाक दाखवून त्यांना घराचा दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावेळी विक्रम मोताळे यांनी घरातील लोकांना आवाज देऊन दरवाजा उघडण्यास सांगीतले. दरवाजा उघडताच दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून विक्रम मोताळे यांच्या डोक्याला कट्टा लावला. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांची आई, भावजय व लहान मुलीच्या अंगावरील दिड तोळा वजनाचे सोन्याचे दागीने व एक मोबाईल असा मुद्देमाल काढून घेतला. त्यानंतर दरोडेखोर सुमारे अर्धा किलोमीटर पळत जावून त्यांनी आणलेल्या स्विप्ट गाडीत बसून वरशिंदे गावच्या दिशेने पसार झाले. रात्री घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दरोडेखोरांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. या घटनेमुळे कानडगाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटने बाबत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

COMMENTS