Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरोडा टाकण्याच्या तयारीतील सशस्त्र टोळी जेरबंद

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील गुहा येथे दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांचा पाठलाग करुन पाच दरोडेखोरांना शिताफीने ताब्यात

बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात 15 भरारी पथके
पारनेर तालुका शिक्षण क्षेत्रात अग्रेसर ठरेल. – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
सरकारी कामात अडथळा…दोघांना कारावास

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील गुहा येथे दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांचा पाठलाग करुन पाच दरोडेखोरांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्या दरोड्याच्या टाकण्याच्या तयारीत असलेला गुन्हा दाखल करुन अधिक तपास केला असता लोणी पोलिस स्टेशन हद्दीतून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या ह्या चोरून आणल्याची कबुली दिली आहे.राहुरी पोलिस हद्दीत गुन्हे केले आहे याचाही पोलिस तपास करत आहे

.                    राहुरी तालुक्यातील गुहा येथे दरोडा टाकण्यासाठी सशस्त्र दरोडेखोर आले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच राहुरी पोलीस स्टेशनच्या राञीच्या गस्तीवरील  पथकाने व गुन्हे शाखेच्या पथकास बरोबर घेवून गुहा ता.राहुरी येथे दरोडेखोर लपलेल्या ठिकाणी छापा मारला असता दरोडेच्या तयारीत असलेल्या सुखदेव रामदास खिलदकर वय 30 वर्ष, साहिल सिकंदर सय्यद वय 25 वर्ष (दोघे रा. नांदूर ता.आष्टी जि. बीड), अरुण बाळासाहेब बर्डे वय 22 वर्ष,सोमनाथ रामदास गायकवाड वय 27 वर्ष, शक्तिमान रामदास गायकवाड (तिघे रा. कुरणवाडी ता. राहुरी जि. अहमदनगर) यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या जप्त केल्या आहेत. या बॅटर्‍या लोणी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरून आणल्याची कबुली दिल्याने लोणी पोलीस स्टेशन कडील गुरन 413 /2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 प्रमाणे उघडकीस आलेला असून लोणी येथील गुन्ह्यात सहभागी आरोपींना राहुरी पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यातील तपास संपल्यानंतर वर्ग करण्यात येणार आहे.  सदर कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक  संजय आर.ठेंगे यांच्या नेतृत्वात सपोनी देवेंद्र शिंदे, सपोनी रविंद्र पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, चालक पोलिस हवालदार शाकुर सय्यद, पोलिस नाईक प्रवीण अहिरे, पो.हे.काँ.सुरज गायकवाड, प्रवीण बागुल , विकास साळवे, सतीश आवारे, बाबासाहेब  शेळके ,पो. कॉ.  प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुर्‍हाडे, सचिन ताजणे, आदिनाथ पाखरे, नदीम शेख, गोवर्धन कदम, रोहित पालवे, गणेश लिपणे, अमोल भांड, मोबाईल सेल श्रीरामपुरचे पो.ना. सचिन धनाड,पो.ना. संतोष दरेकर यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पिंगळे हे करत आहेत.

COMMENTS