अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहर परिसरात तसेच ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेच्या मनमानी कारभाराने शेतकरी वर्ग,तसेच सर्वसामान्य
अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहर परिसरात तसेच ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेच्या मनमानी कारभाराने शेतकरी वर्ग,तसेच सर्वसामान्य नागरिक, नौकरदार आदीसह सर्वच जण त्रस्त झाले असून या विरोधातअखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना यांना गुरूवार 03 जुलै रोजी निवेदन देण्यात आले.
त्यात नमुद करण्यात आले आहे की अंबाजोगाई शहर परिसरातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी वर्ग तसेच सामान्य नोकरदार वर्ग त्रस्त झाले असून राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक व इतर शेतकर्यांचे संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री किसान योजना तसेच शेतकर्यांचा विमा व अनुदान याच बँकांना वर्ग केला जातो. अंबाजोगाई हे गाव जिल्हास्तरावरील शहरात समावेश आहे असे असताना ही शेतकरी ज्या वेळेस बँकेत पैसे काढण्यासाठी योजने संबधी माहिती विचारण्यासाठी जातो . त्यावेळी बँक कर्मचारी, गार्ड,शिपाई,मॅनेजर तसेच व्यवस्थापक हे सातत्याने अपमानास्पद वागणूक देतात प्रसंगी अभद्र तसेच मग्रुरीची भाषा करून त्यांना मनस्ताप देतात यात गर्दीच्या नांवाखाली विनाकारण त्यांना बँकेत रांगेत ताटकळत उभे केले जाते. जेष्ठ नागरिक, अपंग, महिला, शेतकर्याचा यांचा देखील विचार होत नाही या उलट एखाद्या प्रतिष्ठीत ग्राहकाचा भ्रमणध्वनी आल्यास त्याचे काम केले होते राष्ट्रीयकृत बँकेचे ग्राहक जास्त असतील तर बँक व्यवस्थापनाने त्यांचे कर्मचारी संख्या वाढविणे आवश्यक आहे. अरेरावीची भाषा करणार्या कर्मचार्यांवर कारवाई व्हावी, तसेच बँक व्यवस्थापनाला सक्त ताकीद द्यावी की, ग्राहकांचा योग्य तो मानसन्मान ठेवावा यासह इतर मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या मागण्यांबाबत ठोस पाऊले न उचलल्यास अ.भा.मराठा महासंघाच्या वतीने विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी दिला आहे.
COMMENTS