Homeताज्या बातम्यादेश

’प्रलय’ बॅलिस्टिक 120 क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मंजूरी

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर करणार तैनात

नवी दिल्ली ः भारताच्या शेजारी असलेले चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर भरवसा ठेवता येत नाही. कारण दोन्ही देश घुसखोरी करण्यासाठी नेहमीच तयार असत

नामको निवडणुकीत प्रगती पॅनलमध्ये सकल सोनार समाजाचा केवळ मतदाना साठी उपयोग…. 
यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट
मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली ः भारताच्या शेजारी असलेले चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर भरवसा ठेवता येत नाही. कारण दोन्ही देश घुसखोरी करण्यासाठी नेहमीच तयार असतात. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर प्रलय क्षेपणास्त्र तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने सशस्त्र दलांसाठी 120 प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे खरेदी करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. स्ट्रॅटजिक कँपन अंतर्गतअंतर्गत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्याची ही पहिलीच वेळ असेल. हे क्षेपणास्त्र 150 ते 500 किलोमीटरपर्यंतचे आपले लक्ष्य लक्ष्य करू शकते.

माजी सीडीएस जनरल बिपिन रावत सीमेवर रॉकेट फोर्स तयार करण्याचे काम करत होते. डिसेंबर 2021 मध्ये या क्षेपणास्त्राची सलग दोन दिवसांत दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली. तेव्हापासून लष्कर हे क्षेपणास्त्र दाखल करण्याच्या दिशेने काम करत होते. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरिकुमार यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली होती. प्रलय चीनच्या डोंगफेंग क्षेपणास्त्राशी स्पर्धा करू शकतो. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीही याला गोळीबार करता येतो. इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने प्रलय ला रोखणे शत्रुसाठी अत्यंत कठीण ठरणार आहे. प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. प्रणय घन प्रणोदक रॉकेट मोटरने सुसज्ज आहे. यात नवीन तंत्रज्ञान मार्गदर्शन प्रणालीमध्ये अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि एकात्मिक एव्हीओनिक्स देखील आहेत. वृत्तांनुसार, 2015 पासूनच प्रलय बांधण्याची चर्चा सुरू होती. डीआरडीओने आपल्या वार्षिक अहवालात या क्षेपणास्त्राचा उल्लेख केला होता. नुकतेच नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले होते की, दिवंगत जनरल बिपिन रावत रॉकेट फोर्स तयार करण्याचे काम करत होते. जेणेकरून सीमेवर शत्रूचा मुकाबला करता येईल. प्रलय क्षेपणास्त्राची तैनाती हा या मोहिमेचा एक भाग आहे. चीनकडे डोम्सडे लेव्हल डोंगफेंग 12 क्षेपणास्त्र आहे. तर पाकिस्तानकडे गझनवी, एम-11 आणि शाहीन क्षेपणास्त्रे आहेत. गझनवी, एम-11 पाकिस्तानला चीनकडून मिळाले आहे. गझनवी 320 किमी, एम-11 350 किमी आणि शाहीन 750 किमी अंतराची क्षेपणास्त्रे आहेत. अशा परिस्थितीत शत्रूच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याची क्षमता प्रलय च्या तैनातामुळे प्राप्त होणार आहे. डीआरडीओने अद्याप प्रलयच्या वेगाचा खुलासा केलेला नाही, परंतु प्रलय हे क्षेपणास्त्र इतर कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त मारक असल्याचे सांगितले जात आहे. त्याची अचूक मारक शक्ती चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम बनवते. हे जमिनीवरून तसेच कॅनिस्टर लाँचरमधून डागता येते.

COMMENTS