विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती

मुंबई : भाजपचे महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. भाजपचे दि

वृद्ध आईच्या सह्या घेत मुलांनी परस्पर काढले 46 लाख रुपये
आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा प्रयत्न : आ. जयंत पाटील
राज्यात आदिवासी बजेट कायदा अभियान राबविणार

मुंबई : भाजपचे महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. तर, या अगोदर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजप अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणातून काहीसे बाहेर पडल्यानतंर, आता विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणीत महत्वपूर्ण स्थान मिळालेले आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्रातील जुने व संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपाने कापले होते. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांचा समावेश होता. मात्र आता भाजपाकडून या दोन्ही नेत्यांचे पुर्नवसन केले जात असल्याचे दिसत आहे. कारण, कालच बावनकुळे यांना विधानपरिषदचे तिकीट देण्यात आले. त्यानंतर आज विनोद तावडे यांची राष्ट्रीय सस्तरावरील कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली गेली आहे. विनोद तावडे यांनी एकेकाळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदही सांभाळलेले आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून देखील काम केलेले होते.

COMMENTS