Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील विद्युत सहाय्यकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

पुणे / प्रतिनिधी : महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत विद्युत सहाय्यक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीप

सर्वांना सोबत घेऊन हद्दवाढ करणारच : आ. चंद्रकांत जाधव
लाचप्रकरणी कॉन्स्टेबल पोलीस कोठडीत
वडोलीत शेतात वीज पडून बैल ठार

पुणे / प्रतिनिधी : महावितरण पुणे प्रादेशिक विभागांतर्गत विद्युत सहाय्यक पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. गुरुवार, दि. 3 रोजी सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागस्तरीय रोजगार मेळाव्यात या नियुक्तीपत्रांचे वाटप होणार आहे.
या विभागस्तरीय रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तांत्रिक शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत. तसेच कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व खा. गिरीश बापट हे उपस्थित राहणार आहेत. सोबतच स्थानिक विधानसभा व विधान परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.
कागदपत्रे पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांना महावितरणचे नियुक्तीपत्र पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपले नियुक्तीपत्र घेण्यासाठी सकाळी 9 वाजता बहुउद्देशीय हॉल (पाचवा मजला) जिल्हाधिकारी कार्यालय येथे हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दि. 29, 30 व 31 ऑक्टोंबर रोजी महावितरणच्या पुणे, कोल्हापूर व बारामती परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आल्यानंतर विद्युत सहाय्यक या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
पुणे प्रादेशिक विभागांतर्गत एकूण 314 विद्युत सहाय्यकांची निवड करण्यात आली आहे. पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार हे पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. पात्र ठरलेल्या विद्युत सहाय्यकांपैकी 108 उमेदवारांना पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात 48 उमेदवारांना, 54 उमेदवारांना सोलापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात 54 उमेदवारांना व कोल्हापूर जिल्ह्यातील 50 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.

COMMENTS