पाथर्डी /प्रतिनिधीः पाथर्डी शहरातील रहिवाशी असलेले आणि सध्या शिरूर भालगाव येथे तलाठी म्हणुन कार्यरत असलेले अक्षय मातंग यांची सहाय्यक कक्ष अधिकार

पाथर्डी /प्रतिनिधीः पाथर्डी शहरातील रहिवाशी असलेले आणि सध्या शिरूर भालगाव येथे तलाठी म्हणुन कार्यरत असलेले अक्षय मातंग यांची सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पाथर्डी येथील आंबेडकर भवन या ठिकाणी समाजबांधवाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या सन्मान कार्यक्रमाच्या वेळी काकासाहेब शिंदे, दिगंबर गाडे, एकनाथ ढोले, पप्पु बोर्डे, सचिन दळवी, महेंद्र राजगुरू, संतोष एडके,श्रीकांत काळोखे, अंबादास साठे,सुंदरमामा कांबळे,एकनाथ ठोकळ,सुनिल मातंग,रेखा मातंग,संतोष काळोखे आदी जण उपस्थित होते.यावेळी बोलताना अक्षय मातंग बोलतांना म्हणाले की,उपस्थितांमधील युवकांनी भविष्यात आय.ए.एस,आय.पी.एसपदी धडक मारावी.आपल्या समाजाचे कल्याण करावे. अशा शुभेच्छा देण्यात आल्या.तर अक्षय मातंग यांनी सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर कार्य करतांना येणार्या काळात त्यांनेी पदाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करत आपल्या समाजातील हुशार मुलांना प्रशासकीय सेवेत यश संपादन करण्यासाठी सहकार्य करावे. तसेच त्याला मोठे करणार्या आई वडिलांना विसरु नये. असे मत व्यक्त करण्यात आले.
COMMENTS