Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाइन भरता येणार

राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांची माहिती

मुंबई प्रतिनिधी - राज्यात 7 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडला असतांना, अनेक जण उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे.

वारेंचा हट्टीपणा, मोरेंची माघार
अर्धपुर तालुक्यातील दोन तर नांदेड उत्तर मधील पाच ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर 
ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला कौल

मुंबई प्रतिनिधी – राज्यात 7 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडला असतांना, अनेक जण उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक उमेदवारांना ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरतांना अडचणी येत होत्या. त्यात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते धनंजय मुंडे यांनी ऑफलाईन अर्ज भरण्याची उमेदवारांना परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. अखेर गुरुवारी राज्य निवडणूक आयुक्तांनी या मागणीची दखल घेत, ऑफलाईन अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे.
अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची धडपड सुरू असून मुदत वाढून देण्याची मागणी होत आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा दिली आहे. राज्यात सध्या 7 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याठी उद्यापर्यंत वेळ आहे. मात्र सध्या अर्ज भरतांना सर्व्हर डाऊन असल्यामुळे उमेदवारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायचे कसे? असा प्रश्‍न उमेदवारांसमोरं उभा राहिला होता. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते धनंजय मुंडे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाकडे मुदत वाढून देण्याची मागणी केली होती. तयानुसार निवडणूक आयुक्तांनी सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली.  

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस – राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येणार आहे.

COMMENTS