अयोध्या प्रतिनिधी - सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आह
अयोध्या प्रतिनिधी – सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर याच दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील गर्भवती मातांनी एक अजब मागणी केली. त्यांच्या मागणीमुळे रुग्णालय प्रशासन देखील चक्रावून गेलय. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. त्यामुळेच अयोध्येमध्ये ज्या गर्भवती मातांची प्रसूतीची तारीख 22 जानेवारीच्या आसपास आहे. त्यांच्याकडून मागणी करण्यात येत आहे की, आमची प्रसूती ही 22 जानेवारीलाच करण्यात यावी. त्यासाठी या महिलांनी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज करायला सुरुवात केली.
मात्र या महिलांच्या या अजब मागणीमुळे रुग्णालय प्रशासनाला मोठा प्रश्न पडलाय. कारण अशाप्रकारे या महिलांची प्रसूती 22 जानेवारीला करणं म्हणजे ती सामान्य पद्धतीने न करता शस्त्रक्रियेने करावी लागणार. तसेच एक रुग्णालयात एका दिवशी सामान्यपणे 14 ते 15 शस्त्रक्रिया करतात. त्यांच्याकडे आता थेट 35 अर्ज आल्याने त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रियांचे नियोजन करावे लागणार असल्याचं एका रुग्णालयाच्या प्रसुती विभाग प्रमुखांनी सांगितलं. तर 22 जानेवारीला आपली प्रसुती करण्यात यावी. अशी मागणी करणाऱ्या एका गर्भवती मातेने प्रतिक्रिया दिली आहे की, रामलल्लांच्या आगमनाच्या दिवशीच आमच्या बाळाचा जन्म व्हावा. अशी आमची इच्छा आहे. कारण गेल्या शंभर वर्षांपासून आम्ही राम मंदिर निर्माण होण्याची वाट बघतोय. त्यामुळे 22 जानेवारी हा दिवस आमच्या बाळाचे या जगात आगमन होण्यासाठी एक सुदैवयोग असेल असेही महिला म्हटले.
COMMENTS