Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीच्या यवतमाळ वाशिमच्या उमेदवाराचा अर्ज बाद

यवतमाळ प्रतिनिधी - महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी हो

सातासमुद्रापार बहरला ‘मधुमास नवा’, किली आणि नीमाच्या सुंदर डान्सने जिंकलं चाहत्यांचं मन
प्रवाशांचा जीव मुठीत घेत हातात छत्री धरून ड्रायव्हर चालवतोय बस
बचावात्मक कार्य युद्धपातळीवर सुरू

यवतमाळ प्रतिनिधी – महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होईल. त्यानंतर दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे रोजी होणार आहे. यवतमाळ मतदार संघातून वंचित आघाडीला धक्का बसला आहे. अभिजित राठोड यांचा अर्ज बाद झाला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांची महायुती आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीत शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस आहे. या दोन युती आणि आघाड्याच्या लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने रंगत आणली आहे. वंचितने राज्यात अनेक ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहे. परंतु आता वंचित आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. अर्जात त्रुटी असल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. अभिजित राठोड यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले आहे.

राज्यातील लोकसभेच्या ८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जागेसाठी २६ एप्रिलला मतदान होईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३५२ उमेदवारांनी ४७७ अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल करण्याची मुदत ४ एप्रिल रोजी समाप्त झाली. आज ५ एप्रिल रोजी त्या अर्जांची छाननी झाली. त्यात यवतमाळ मतदार संघातून वंचित आघाडीला धक्का बसला आहे. अभिजित राठोड यांचा अर्ज बाद झाला आहे.

COMMENTS