Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपवासात भगर खाताना काळजी घेण्याचे आवाहन

नांदेड । प्रतिनिधी उपवासाच्या काळात भगरचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. मात्र भगरवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अन्न विषबाधा होण्याच्या घटना यापूर्वी घ

जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दलालांची गर्दी
नांदेड महापौरपदाची रंगतदार चुरस : खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मनात नेमके कोण?
ई-गव्हर्नन्समध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्राचा डंका; महाराष्ट्र राज्यात पटकावला प्रथम क्रमांक

नांदेड । प्रतिनिधी
उपवासाच्या काळात भगरचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. मात्र भगरवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अन्न विषबाधा होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. दमट वातावरणामुळे बुरशी वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी भगर खरेदी व वापर करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पॅकबंद व लेबल असलेलीच भगर खरेदी करावी. पॅकिंग व अंतिम वापर दिनांक तपासावा. भगर कोरड्या व हवाबंद डब्यात साठवावी. जुनी किंवा जास्त दिवस साठवलेली भगर व पीठ वापरू नये. शक्यतो आवश्यक तेवढेच पीठ दळावे. सलग उपवास करताना भगर व शेंगदाणे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. भगर विक्रेत्यांनी मुदतबाह्य किंवा सुटी भगर विक्री करू नये. नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा  2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी कळविले आहे.

COMMENTS