Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एपीएमसीतील शौचालय वितरण घोटाळा, दोन कंत्राटदारांना अटक

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय वितरण घोटाळा प्रकरणी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म

मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी
राजकीय फटाके फुटायला अजून वेळ
आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने केला साखरपुडा ?

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय वितरण घोटाळा प्रकरणी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गुन्हा नोंद झालेल्या आरोपीत या दोघांची नावे नाहीत. दोन्ही आरोपींना 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात असणार्‍या शौचालय कंत्राटमध्ये शासनाचे 7 कोटी 61 लाख 49 हजार 689 रुपयांचे नुकसान झाल्याच्या आरोपा प्रकरणी माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सह अन्य सात अशा एकूण आठ जणांच्या विरोधात 11 तारखेला गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत कारवाई करीत सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोघांना आज (शनिवारी) अटक करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यात मारू आणि पाटील यांचा समावेश नाही. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही 22 तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुणावली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी दिली.

COMMENTS