मेथक्युलोन अमली पदार्थ  विक्रीस आणणाऱ्या चौघांना एपीएमसी पोलिसांनी केले गजाआड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेथक्युलोन अमली पदार्थ  विक्रीस आणणाऱ्या चौघांना एपीएमसी पोलिसांनी केले गजाआड

  नवी मुंबई प्रतिनिधी - नशा मुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी मेथक्युलोन नावाचा अमली पदार्थ विक्री चालणाऱ्या चौघांना गजाआड केल

सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका दिसत नाही.
राजकीय भूमिकेतील ईव्हीएम !
शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता ममतांची साथ

  नवी मुंबई प्रतिनिधी – नशा मुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी मेथक्युलोन नावाचा अमली पदार्थ विक्री चालणाऱ्या चौघांना गजाआड केल्याची घटना घडली आहे. एपीएमसी परिसरात 16 तारखेला रात्री साडेदहाच्या सुमारास मेथक्युलोन हा अमली पदार्थ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून नवी मुंबई पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने एपीएमसी परिसरातील वारणा सर्कल माफको मार्केट परिसरात पोलिसांनी सापळा रचला व तिथे आढळलेल्या होंडा सिटी या गाडीत चार व्यक्ती असल्याचे आढळून आले व त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे मेथक्युलोन हा अमली पदार्थ आढळला त्या अनुषंगाने पोलिसांनी या चौघांना अटक केले आहे व त्यांच्याकडून तब्बल 32 लाखाचा माल हस्तगत केला आहे. शिवाय या चारही आरोपींना 22 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

COMMENTS