अंबाजोगाई प्रतिनिधी - यूपीएससी मार्फत घेण्यात येणार्या ’भारतीय वन सेवा’ (खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश) साठीच्या परिक्षेत अंबाजोगाईच्या अनुष्का अभि

अंबाजोगाई प्रतिनिधी – यूपीएससी मार्फत घेण्यात येणार्या ’भारतीय वन सेवा’ (खपवळरप ऋेीशीीं डर्शीींळलश) साठीच्या परिक्षेत अंबाजोगाईच्या अनुष्का अभिजीत लोहिया हिने संपूर्ण देशभरातून चौथा तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवून उत्तुंग यश प्राप्त केले आहे. अनुष्का हि लातूर येथील दयानंद महाविद्यालयातील प्राध्यापक अभिजीत लोहिया आणि अंबाजोगाई येथील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. शुभदा लोहिया यांची कन्या आहे.
अनुष्का लोहिया हिने पुण्याच्या सीओइपी कॉलेजमधून सिव्हील इंजिनीअरींगची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षांसाठी तयारी सुरु केली. मुळातच निसर्गाची आवड असल्याने तिने आयएएस अथवा आयपीएस साठी तयारी न करता भारतीय वन सेवेला (आयएफएस) प्राधान्य दिले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने यूपीएससीचे कठीण शिखर सर करत आयएफएस पदाला गवसणी घातली आहे. एवढेच नव्हे तर या परिक्षेत तिने संपूर्ण भारतातून चौथा तर महाराष्ट्रातून पहिला क्रमांक प्राप्त केला आहे. अनुष्काने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
COMMENTS