युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

कीव्ह/वृत्तसंस्था ः रशिया-युक्रेनचा युद्धाच्या सातव्या दिवशी देखील या युद्धाची तीव्रता कमी झाली नसून, विध्वसांची तीव्रतेत मोठी वाढ झाली असून, बुधवारी

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आजीबाई बजावणार  मतदानाचा हक्क
खोटी प्रतिज्ञापत्रे घेवून येणारा तो एनडीएचा पदाधिकारी
चांद्रयाननिमित्त राष्ट्रीय अंतराळ दिनाची घोषणा  

कीव्ह/वृत्तसंस्था ः रशिया-युक्रेनचा युद्धाच्या सातव्या दिवशी देखील या युद्धाची तीव्रता कमी झाली नसून, विध्वसांची तीव्रतेत मोठी वाढ झाली असून, बुधवारी आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. चंदन जिंदाल नावाचा 22 वर्षीय विद्यार्थी विनितसिया नॅशनल पायरोगोव्ह मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता आणि तो मूळचा पंजाबचा होता. चंदनला इस्केमिक स्ट्रोक आला होता आणि त्याला विनितसिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या वडिलांनी भारत सरकारला पत्र लिहून चंदनचा मृतदेह भारतात परत आणण्याची विनंती केली आहे.
युक्रेनमधील भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी करून सर्व नागरिकांना खार्किव्ह शहर सोडण्यास सांगितले आहे. भारतीय नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत खार्किव्ह शहर सोडून पेसोचिन, बाबे आणि बेझल्युडोव्हका वसाहतींमध्ये पोहोचावे, असे भारतीय दूतावासाने म्हटले. युक्रेनच्या अनेक शहरात हल्ला बॉम्ब हल्ला करण्यास सुरूवात केल्याने तिथले वातावरण भयभीत झाले आहे. तसेच रशियाने आत्तापर्यंत केलेल्या हल्ल्यात युक्रेनचा लष्करीसाठा आणि सरकारी कार्यालयावरती जोगदार हल्ला केल्याचे समोर आले आहे. रशियाकडून युक्रेनमधली प्रसुतीगृहासह पोलीस हेडक्वार्टर्सवरती हल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे.
कीव्हवर कब्जा मिळविण्यासाठी रशियन कमांडो पथक उतरले आहे. शहराबाहेर 64 किलोमीटर अंतर रशियन लष्कराने कब्जा केला आहे. अशातच युक्रेनच्या दक्षिण-पूर्व भागातही रशियन सैन्याने आगेकूच सुरु आहे. बुधवारी सकाळी खार्किवमध्ये रशियन सैन्याने हवाई मार्गाने घुसखोरी केली. यानंतर एका हॉस्पिटलमध्ये हल्ला केल्याचे युक्रेनच्या लष्कराने म्हटले आहे. मंगळवारी रात्री खार्किव येथील युक्रेनच्या शस्त्रासाठा डेपो रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्याने उद्ध्वस्त केला. युद्धाच्या सातव्या दिवशी युक्रेनमधील महत्वाच्या शहरांवरील हल्ले आणखी तीव्र करण्यात आले आहेत. खार्किवमध्ये रयिशन सैनिकांनी हवाई मार्गाने प्रवेश केला. येथील एका हॉस्पिटलवरही त्यांन हल्ला केल्याचे युक्रेनच्या लष्कराने म्हटले आहे. दरम्यान, युक्रेनच्या आपत्तकालीन सेवेने नागरिकांसाठी व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून हेल्पलाईन सुरु केली आहे. यामुळे हल्ला झालेल्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी मदत होणार आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये 100 देशांच्या राजदुतांचा रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचा बहिष्कार टाकला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे मानवाधिकार परिषदेमध्ये बोलण्यासाठी उभारल्यानंतर 100 राजदुतांनी सभात्याग केला. रशियाने युक्रेनमधील कीव्ह, खार्किव आणि चेर्निहायव शहरांतील नागरी वस्त्यांवर बॉम्बहल्ले आणखी तीव्र केले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील शहरांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता जागतिक बँक युक्रेनच्या मदतीसाठी सरसावली आहे. जागतिक बॅकेकडून युक्रेनला 3 अब्ज डॉलरची मदत दिली जाणार आहे. यातील 35 कोटी डॉलर पुढील आठवड्यात दिले जाणार असल्याची माहिती जागतिक बँकेच्या सूत्रांनी दिली. संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत युक्रेनमधील 6 लाख 60 हजार नागरिकांनी देश सोडला आहे.

रशियन सैनिकांनी केले भारतीय विद्यार्थिनींचे अपहरण
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धाचा आज सातवा दिवस सुरू आहे. युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. परंतु मंगळवारी खार्कीव्ह शहरात तोफमार्‍यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यामुळे युक्रेनमधून परतण्यासाठी मदतीची याचना करणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांपुढील संकटाची गंभीरता समोर आली आहे. अशातच एका भारतीय विद्यार्थीनीने तिथली धक्कादायक परिस्थिती एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली आहे.

24 तासात 1300 भारतीयांची सूटका
युक्रेनमधील बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढले जात आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत युक्रेनमध्ये अडकलेल्या भागातून 1300 हून अधिक लोकांना मायदेशी आणण्यात आले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितले की, भारताने गेल्या 24 तासांत युद्धग्रस्त युक्रेनमधून 1,377 नागरिकांना बाहेर काढले आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत, भारत पुढील तीन दिवसांत 26 हून अधिक उड्डाणे चालवत आहे. युक्रेनचे हवाई मार्ग बंद झाल्यामुळे भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रोमानिया, हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाक रिपब्लिकमधील विमानतळांचा वापर केला जात आहे.

COMMENTS