Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात पुन्हा हिट अ‍ॅण्ड रनची घटना

मद्यधुंद कार चालकाने 8 जणांना चिरडले दोघांचा मृत्यू

नागपूर : पुण्यानंतर आता उपराजधानी नागपुरमध्ये देखील हिट अ‍ॅण्ड रनच्या घटना सातत्याने घडत आहे. नागपुरात एका वृद्ध व्यक्तीला चिरडल्याची घटना ताजी अ

संतसाहित्य आणि तीर्थस्थळे ही मानवी जीवनाची अमृतस्थळे
कोकणात 15 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
राज्यसभेचे 19 खासदार निलंबित

नागपूर : पुण्यानंतर आता उपराजधानी नागपुरमध्ये देखील हिट अ‍ॅण्ड रनच्या घटना सातत्याने घडत आहे. नागपुरात एका वृद्ध व्यक्तीला चिरडल्याची घटना ताजी असतांनाच रविवारी रात्री एका मद्यधुंद इरटीका कार चालकाने चालकाने फुटपाथवर झोपलेल्या 8 मजुरांना चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ रविवारी रात्री सव्वा बारा हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत गाडी चालवणार्‍या कारचालक भूषण लांजेवार याला अटक केली आहे. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी तो त्याच्या मित्रासोबत गेला होता. तो उमरेड मार्गाकडे जात असतांना लांजेवारचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. या कारखाली तीन महिला, चार मुले व एका पुरुष आला. यात एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका लहान मुलीचा देखील मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठा आक्रोश पाहायला मिळाला. कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने सर्व जखमींना उपचारासाठी दवाखान्यात भरती केले, उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधमोहीम राबविली व कारचालक भूषण लांजेवार याला अटक केली. या अपघातात आणखी पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे यांनी दिली. रस्त्याव झोपलेले मजूर हे रस्त्यावर खेळणी विकून उदरनिर्वाह करत होते. यात त्यात महिला-मुलांचादेखील समावेश होता. सर्व मजूर जेवण करून झोपले असतांना काररूपी काळाने त्यांच्यावर घाला घातला दारूच्या नशेत चालकाने फुटपाथवर गाडी चढवली. यावेळी गाडी मागे पुढे करण्याच्या नादात मजुरांचा मृत्यू झाला. हिट अँड रन प्रकरणातील गाडीत सात जण होते. कारचालक भूषण लांजेवार, सौरभ कंडुकर, वंश झाडे, सन्मय पात्रेकर, अथर्व बानाईत, अथर्व मोघरे व ऋषिकेष चौबे अशी सर्वांची नावे आहेत. हे सर्व जण वंश झाडे यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला नागपूरच्या शेरे पंजाब धाब्यावर गेले होते. ही गाडी सौरभ कडुकरच्या मालकीची आहे. तर पार्टी झाल्यावर कार भूषण लांजेवारने चालवायला घेतली. हे सर्व मित्र 20 ते 22 वयोगटातील आहेत.

कठोर कारवाईचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश – या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सोबतच रात्रीची गस्त वाढवून ’ड्रंक अँड ड्राईव्ह’ची मोहीम अधिक तीव्र करावी, असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.

COMMENTS