Homeताज्या बातम्यादेश

आफ्रिकेतून आणखी 12 ते 14 चित्ते आणणार

पर्यावरण मंत्री आश्‍विनीकुमार चौबे यांची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली ः आफ्रिकेतून आणखी 12 ते 14 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्‍विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत ही माहिती दिल

प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना
सखींनी जाणून घेतला सुदृढ आरोग्‍याचा मुलमंत्र
सलमान खानच्या जीवनावरील डॉक्‍युड्रामाचे काम जोरात सुरू (Video)

नवी दिल्ली ः आफ्रिकेतून आणखी 12 ते 14 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्‍विनीकुमार चौबे यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. यासंदर्भात पर्यावरण मंत्री चौबे यांनी सांगितले की, येत्या 5 वर्षात आफ्रिकेतून 12 ते 14 चित्ते भारतात आणले जातील. यासाठी भारत सरकारने नामिबिया सरकारसोबत करारही केला आहे. नुकतेच नामिबियातून 8 चित्ते भारतात आणून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. त्यात 5 मादी आणि 3 नर चित्त्यांचा समावेश आहे. कुनो येथे रुळल्यानंतर या चित्त्यांनी शिकार करण्यास सुरुवात केली आहे. प्रोजेक्ट टायगर अंतर्गत, भारतात चित्त्यांच्या पुनरागमनासाठी 38.7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा प्रकल्प 2021-22 पासून सुरू होऊन 2025-26 पर्यंत चालणार आहे.


याबाबत अधिक माहिती देताना अश्‍विनीकुमार चौबे म्हणाले की, कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेले 8 चित्ते पूर्णपणे ठीक आहेत. नामिबियातून भारतात आणल्यानंतर या सर्व चित्त्यांना काही काळ क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये  सोडण्यात आले. विशेष म्हणजे 16 वनरक्षकांचे पथक या चित्त्यांवर लक्ष ठेऊन आहे.

COMMENTS