सातारा / वार्ताहर : महसूल वाढीसाठी किराणा मालाच्या दुकानांत मद्य विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासन घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. सरक
सातारा / वार्ताहर : महसूल वाढीसाठी किराणा मालाच्या दुकानांत मद्य विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासन घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. सरकार असा निर्णय घेणार असेल तर त्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात येऊन तरुण पिढीचे नुकसान होणार असल्याने अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले. या निवेदनात विचाराधीन निर्णय मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘अंनिस’च्या सातारा शाखा आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. त्यावेळी डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, वंदना माने, अॅड. हौसेराव धुमाळ, उदय चव्हाण, रूपाली भोसले, योगिनी मगर, कुमार मंडपे, डॉ. दीपक माने, विजय पवार, भगवान रणदिवे, प्रमोदिनी मंडपे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, विविध कारणांमुळे आजची तरुण पिढी व्यसनांना जवळ करत आहे.
व्यसनाधीन तरुणाईला त्यातून बाहेर काढण्याचे काम अंनिस आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था करत आहे. त्यातच शासनाने किराणा तसेच रेशन दुकानात वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे तरुणाईत व्यसनाधिनता वाढीस लागण्याचा धोका आहे. विशेषत: महिला वर्ग त्याकडे जास्त आकर्षित होण्याची शक्यता आहे. या निवेदनात संभाव्य धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
COMMENTS