Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आण्णाभाऊ साठेंचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंनी प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती केली, साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील असे प्रति

मुलांना चांगले आणि विविध क्षेत्रातील शिक्षण देणे गरजेचे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
माझा कुठलाही राजकिय निर्णय नाही-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
मतदारांचा मूड बदलला; आता बदल काळाची गरज-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड प्रतिनिधी – साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंनी प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती केली, साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव येथे बुधवार दि.30 रोजी बहूजन रयत परिषदेच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मणराव ढोबळे, माजी आ.पृथ्वीराज साठे, कोमताई ढोबळे, संतोष हांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, चंद्रापर्यंत जाणारा आपला देश आहे, इतके तंत्रज्ञान पुढे गेले आहे तरीही समाजातील काही घटक अजूनही दुर्लक्षीत आहेत. गरीबी हटता हटत नाही आणि आजही लाखो कुटूंब हातावर पोट असणारी आहेत. बीड जिल्हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने दुष्काळाचा सामना करत आहे. एक वर्ष ओला दुष्काळ आणि चार वर्ष कोरडा दुष्काळ पडतो यासाठी दिर्घकालीन योजना आणने गरजेचे आहे. संपूर्ण मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सामान्य शेतकर्यांचा विचार करून भविष्यात मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे तरच गरीबी मिटवण्यासाठी ही मोठी उपलब्धी राहील. साहित्यरत्न आण्णाभाऊंनी प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती केली. साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. बीड जिल्हा मागासलेला म्हणून जो क्रमांक लागत आहे तो आजच्या मुलांनी पुसण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील 52 मुले महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पास होऊन आज मोठ्या पदावर गेले आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, गावागावातील मातंग समाजाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घेऊन, विचार घेऊन, मानाने जगावे, व्यसनापासून दूर रहावे, मुलांना चांगले शिकवा, जोपर्यंत तुम्ही शिकून मोठे होत नाहीत तोपर्यंत तुमच्या घरातला दुसरा कोणी शिकणार नाही. सुख-दुःखात एकमेकांना मदत करा असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक अशोक जाधव आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, पाणीपुरवठ्यासाठी वीज, प्राथमिक आरोग्य केंद्र, सबस्टेशन ही कामे माजी मंत्री जयदत्त आण्णांनी केली. चौसाळा मतदारसंघ असताना या भागात केलेली कामे अनेक गावे आजही नाव घेत आहेत. स्व.काकूंचा वसा आणि वारसा आण्णा आज उत्तमपणे चालवत आहेत असे ते म्हणाले. यावेळी प्रेमचंद कोकाटे, भिमराव आघाव, ईश्वर क्षीरसागर, शिवाजीराव दराडे, बबन हंडगे, अशोक मोराळे, श्रीकांत जाधव यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, महिला-पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS