राहाता प्रतिनिधी : राहाता येथील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेचे सुरेगाव येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत असणारे प्राध्यापक अनिल पा
राहाता प्रतिनिधी : राहाता येथील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेचे सुरेगाव येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत असणारे प्राध्यापक अनिल पावटे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक तथा श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे होते. तर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ बाबुराव उपाध्ये सोहळ्याचे स्वागतध्यक्ष होते. या कार्यक्रमा प्रसंगी संत साहित्याच्या अभ्यासिका व श्रीरामपूरच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे, प्राचार्य शिरीष लांडगे, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या ग्रामीण साहित्य संमेलना प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रविवार 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेकडे कार्यरत असलेले प्राध्यापक अनिल पावटे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन व साहित्य सेवा कार्य गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून साहित्यिक लेखक कवी प्राध्यापक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक अनिल पावटे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे या कार्यक्रमाचे निवेदन प्रसन्न धुमाळ व संगीता फासाटे यांनी केले.
COMMENTS