Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल देशमुखांची आज होणार सुटका

जामिनावरील स्थगितीची याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज बुधवारी त्या

तडजोडीस नकार दिल्यानंतर मला ईडीकडून अटक
मला अडकवण्यासाठी परमबीर सिंहांचा वापर
अनिल देशमुखांना जामीन मंजूर

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज बुधवारी त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. यापूर्वीच देशमुख यांना जामीन मिळालेला होता. मात्र सीबीआयने हस्तक्षेप याचिका करत, न्यायालयाकडे तपासासाठी 10 दिवसांचा अवधी मागितला होता. तो संपल्यानंतर न्यायालयाने पुन्हा 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र न्यायालयाने तिसर्‍यांदा मागितलेली स्थगिती न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे देशमुखांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी  होईपर्यंत अनिल देशमुखांच्या जामिनावरची स्थगिती वाढवा, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आज बुधवारी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे जामीन मिळूनही अनिल देशमुखांना तुरुंगातच राहावे लागले होते. अखेर हायकोर्टानं जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली आणि अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

COMMENTS