अनिल बोंडे दिवसाही दारू पितात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल बोंडे दिवसाही दारू पितात

काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर यांची टीका

अमरावती प्रतिनिधी-  राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप नेते खासदार अनिल बोंडे(Anil Bonde) यांनी टीका करत राहुल गांधी(Rahul gandhi) यांची तुल

Solapur : हुलजंतीत गुरू- शिष्यांच्या पालखी भेट सोहळा उत्साहात… (Video)
मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन घेतले मागे
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतुन रोजगार निर्मिती

अमरावती प्रतिनिधी-  राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजप नेते खासदार अनिल बोंडे(Anil Bonde) यांनी टीका करत राहुल गांधी(Rahul gandhi) यांची तुलना रावणासोबत केली होती, याला काँग्रेसने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिल आहे . काँग्रेसचे राज्य प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी अनिल बोंडे वर निशाणा साधला,बोंडे भाजप मध्ये येण्यापूर्वी दिवसा दारू ढोसत होते आता भाजप मध्ये आल्यावर दुपारीही ढोसत आहेत  याचच हे निदर्शक आहे.  कशाची तुलना कुठ करायची याच  त्यांना भान राहल नाही तर ते भाजप मधील बेवकुब आहेत .  रा पासून रावण होत आहे तर नरेंद्र मोदी चा न पासून नराधम होतो  व अमित शहा यांच्या अ पासून अमानुष पण  यालाही मान्यता त्यांनी द्यायला पाहिजे.   भारत जोडो यात्रे मुळे भाजपची तंतरली आहे, म्हणून त्याची पातळी सुटली आहे अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली.

COMMENTS