शिर्डीतील साईबाबा मंदिराला अनंत अंबानींची दीड कोटींची देणगी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीतील साईबाबा मंदिराला अनंत अंबानींची दीड कोटींची देणगी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी दिवाळीनिमित्त साई बाबांच्या चरणी नतमस्तक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी दिवाळीनिमित्त साई बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर अनंत अंबानी यांनी साईबाबा मंदिर संस्थ

साहित्यिक चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज – अभय आव्हाड
सुरेशराव कोते यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी दिवाळीनिमित्त साई बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर अनंत अंबानी यांनी साईबाबा मंदिर संस्थानाला १.५ कोटी रुपयांची देणगी अर्पण केली. साई संस्थानाने याबद्दल माहिती दिली आहे. साई बाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत याही अनंत अंबानी यांच्याबरोबर होत्या. एक तास अनंत अंबानी मंदिरात होते. त्यांनी साईबाबांची मध्यान्ह आरतीही केली. त्यानंतर कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अनंत अंबानी यांनी दीड कोटी रुपयांच्या देणगीचा चेक सुपूर्द केला, असे मंदिर ट्रस्टच्या एका प्रवक्त्याने सांगितलं.

COMMENTS