Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूर तालुक्यात आनंदाचा शिधा वितरण सुरु – सुहास पुजारी

श्रीरामपुर  ( प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यासाठी गुढी पाडवा व डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणारा आनंदा शिधाचे वितरण श

गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या ठेवी 35 कोटीवर
कोरेगावचा लुटारू अखेर कर्जत पोलिसांकडून जेरबंद
करंजीत वादळी वार्‍यामुळे सात लाखाचे नुकसान

श्रीरामपुर  ( प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यासाठी गुढी पाडवा व डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणारा आनंदा शिधाचे वितरण श्रीरामपुर तालुक्यात सुरु करण्यात आले असुन पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी गोदाम व्यवस्थापक अर्जुन सानप मिलींद नवगीरे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई सचिव रज्जाक पठाण तालुकाध्यक्ष बजराग दरंदले प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे शहर प्रमुख गोपीनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुकाननिहाय वितरण सुरु करण्यात आले                                   

    या वेळी बोलताना गोदाम व्यवस्थापक अर्जुन सानप यांनी सांगितले की चार दिवसात श्रीरामपूर येथील शासकीय गोदामातून गावोगावच्या धान्य दुकानात आनदांचा शिधा किटचे वितरण पुर्ण करण्यात येणार आहे .

स्वस्त धान्य दुकानदारांनी लगेच गावपातळी वरील आनंदांचा पात्र लाभार्थी शिधा शिधापत्रिका धारकांना वितरण सुरु करावे तसे ज्या धान्य दुकानदारांना चालु महिण्याचे  गहु तांदूळ प्राप्त झालेले आहे, धान्याचे देखील वाटप सुरु करावे असे अवाहन सानप यांनी केले आहे . पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांनी सांगितले की , तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी तातडीने स्वयः घोषणापत्र भरुन द्यावे दुकानदार संघटनेने मोफत धान्य वाटप सुरु असल्यामुळे आनंदाचा शिधाही उधारीवर द्यावा अशी मागणी संघटनेने केली होती या मागणीची दखल घेवुन शासनाने दुकानदाराकडून स्वयः घोषणापत्र भरुन उधारीवर शिधा देण्याचे आदेश दिल्यामुळे दुकानदारांनी तातडीने स्वयः घोषणापत्र भरुन द्यावे जेणे करुन वितरण करणे सोयीस्कर होईल तसेच  दुकानदारांनी पुर्ण वेळ दुकान उघडे ठेवून तातडीने वाटप सुरु करावे आंनदाचा शिधा वाटपाबाबत तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी असे हि आवाहन पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांनी केले आहे .

या वेळी खिर्डी येथील जयश्री हेलकुटे , पप्पू तेलोरे , मच्छींद्र भालके , रऊफभाई शहा , अकीलभाई शेख , रिजवान पठाण , संजय चंदन आदिंसह गोदामातील हमाल व माथाडी कामगार उपस्थीत होते

COMMENTS