पुतण्याच्या लग्नात नाचताना काकाला हृदयविकाराचा झटका आला  

Homeताज्या बातम्यादेश

पुतण्याच्या लग्नात नाचताना काकाला हृदयविकाराचा झटका आला  

लग्न सोहळ्यात अचानक घडलेल्या घटनेने मोठा धक्का बसला

वाराणसी प्रतिनिधी मागच्या काही दिवसांत थंडीत वाढ झाल्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असते यामुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ ह

येवला बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात 
चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
राजस्थानमध्ये भाजपची 14 जागांवर आघाडी

वाराणसी प्रतिनिधी मागच्या काही दिवसांत थंडीत वाढ झाल्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असते यामुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.  दरम्यान वाराणसीमध्ये अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुतण्याच्या लग्नात नाचताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने जागीच कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.वाराणसीच्या पिपलानी कटरा अवघडनाथ टाकिया येथील मनोज विश्वकर्मा (वय 40) हे पुतण्याच्या लग्नात आनंदाने नाचत होते. त्यांना अचानक हृदयविकाराच्या झटका आल्याने ते जागीच कोसळले. लग्न सोहळ्यात अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यानाच मोठा धक्का बसला आहे. अवघ्या काही मिनीटात आनंदाच्या भरात नाचणाऱ्या सगळ्यांना दु:खद घटनेला सामोरे जावे लागले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS