श्रीरामपुरात पोलिस ठाण्यातच अधिकार्‍याला धक्काबुक्की व मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपुरात पोलिस ठाण्यातच अधिकार्‍याला धक्काबुक्की व मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी : अपहृत मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिस तपासाबाबत जाब विचारल्याने तपासी अधिकारी उपनिरीक्षक समाधान सुरवाडे व नातेवा

नेप्ती परिसरात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे होणार -गाडे
गणेशची सत्ता गेली तरी ऋणानुबंध कायम ः खासदार डॉ. विखे
बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज

अहमदनगर/प्रतिनिधी : अपहृत मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिस तपासाबाबत जाब विचारल्याने तपासी अधिकारी उपनिरीक्षक समाधान सुरवाडे व नातेवाईकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी उपनिरीक्षक सुरवाडे यांना धक्काबुक्की व मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा 13 फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांत नोंदविण्यात आला होता. त्याचा तपास सुरवाडे यांच्याकडे होता. या मुलीच्या शोधासाठी सुरवाडे पोलिस नाईक किरण पवार, हवालदार तुषार गायकवाड यांच्यासह 10 मे रोजी पुण्याला गेले होते. तेथून संबंधित मुलगी शिर्डी येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील यांनी अपहृत मुलीचा शिर्डी परिसरात शोध घेतला. साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ तिच्या वडिलांना ती सापडली. तिला श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आणल्यावर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास अपहृत मुलीचा जबाब नोंदवीत असताना वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी मुलीचे नातेवाईक कक्षामध्ये आले. त्यातील एकाने, मुलीची वैद्यकीय तपासणी का करत नाही?, असा सवाल केला. त्यानंतर नातेवाईक व सुरवाडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर तिघांनी मिळून सुरवाडे यांना मारहाण करीत जखमी केले. यावेळी पोलिस ठाण्यात व कक्षामधील नेमणुकीस असलेले अंमलदार सोमनाथ गाडेकर, पोलिस शिपाई भारत तमनर, महिला पोलिस शिपाई योगिता निकम, सरग, ठाणे अंमलदार आलम पटेल, हवालदार पोपट भोईटे, नागरिक सुनील मुथा व सुभाष जंगले यांनी मध्यस्थी करीत सुरवाडे यांची सुटका केली. यात गाडेकर यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी सुरवाडे यांच्या फिर्यादीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिस ठाण्यातच पोलिस अधिकार्‍याला मारहाण करण्याची घटना जिल्हा पोलिस दलात खळबळ उडवून गेली आहे.

COMMENTS