Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मानवधन संस्थेची दिशादर्शक जीवनमूल्य देणारी अभिनव संकल्पना – पो. आ. सुधाकर सुरडकर

नाशिक  - मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक राबवीत असलेल्या विविध जीवनोपयोगी मुल्याधिष्टीत उपक्रमातील एक उपक्रम म्हणजे 'छोटा पोलीस' हा उप

कोपरगावात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई – पो नि देसले
नाफेड सरसकट कांदा खरेदी करू शकत नाही
ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने गॅस टँकर पलटी | LOK News 24

नाशिक  – मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक राबवीत असलेल्या विविध जीवनोपयोगी मुल्याधिष्टीत उपक्रमातील एक उपक्रम म्हणजे ‘छोटा पोलीस’ हा उपक्रम होय. आजवर विविध स्तरावर या उपक्रमांची दखल घेण्यात आलेले आहे. या उपक्रमाचे महत्त्व याची गरज संस्था राबवित असलेली कार्यपद्धती समजून नाशिक शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर आणि वाहतूक शाखा युनिट 3 चे नाईक सचिन जाधव यांनी मानवधन संस्था संचलित धनलक्ष्मी बाल विद्यामंदिर प्राथमिक शाळा, पाथर्डी फाटा, नाशिक येथे भेट दिली.

         रस्ता सुरक्षा अभियान, “नो हेल्मेट – नो एंट्री”  माझी सुरक्षा माझ्या हाती वाहतूक नियमन अशा विविध स्तरावर छोटा पोलीस उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून प्रभावीपणे होत असलेल्या कार्याचा मा.पो. आयुक्तांनी आढावा घेतला. आदर्श जीवनमूल्य अंगीकारल्यास स्वतःच्या सुरक्षेबरोबरच सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक सुरक्षा आपण जोपासू शकतो, असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळेस दिला. नाईक सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांनी प्रवास करताना घ्यावयाची काळजी, स्त्रियांनी आपल्या सुरक्षिततेबद्दल घ्यावयाची सतर्कता याविषयी मार्गदर्शन केले. प्रस्ताविकेत संस्थेचे संस्थापक तसेच या उपक्रमाचे उद्गाते प्रकाश कोल्हे यांनी उपक्रमाचे महत्त्व समजावून देताना सांगितले की, उक्रमाचे स्वरूप अधिक व्यापक व्हावे, या उद्देशाने बालवर्गापासून ते प्राथमिक शिक्षण सर्व शाळांमधून सन २०१५ पासून सुरू केली आहे. प्रात्यक्षिकातून व प्रतिकृतींच्या साह्याने सिग्नलच्या दिव्यांचा अर्थ व ‘रस्ता सुरक्षा नियमन’ याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येते. ‘हसत खेळत शिक्षण’ या धोरणाचा अवलंब करत, क्षेत्रभेटीचा आनंद देत विद्यार्थ्यांना ‘ट्रॅफिक पार्क’ येथे नेऊन प्रत्यक्ष अनुभवातून संपूर्ण माहिती दिली जाते. 

     कार्यक्रमाला शिक्षक प्रतिनिधी, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज कुमार यांनी केले.

COMMENTS