कोपरगाव तालुका ः रक्षाबंधन सणा निमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठान दरवर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवत असते.प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवे
कोपरगाव तालुका ः रक्षाबंधन सणा निमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठान दरवर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबवत असते.प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केलेला असून हजारो महिला भगिनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात.संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक सीमेवर जाऊन जमा होणार्या राख्या सैनिक बांधवांना या सुपूर्त करतात व त्या ठिकाणी रक्षाबंधन साजरे केले जाते.या कौतुकास्पद उपक्रमाचे राखी जमा करण्याच्या स्टॉलचे उद्घाटन संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
देशाच्या सीमेवर रक्षण करणारे जवान आणि अगदी कोपरगावची बाजारपेठ फुलविनारे लहान मोठे व्यापारी यांचे योगदान राष्ट्र पुढे जाण्यासाठी मोलाचे आहे.जवान देश सुरक्षित ठेवत आहे तर जबाबदार नागरिक म्हणून अनेकजण आपले कर्तव्य पार पाडत आहे.आपल्या परीने प्रत्येक क्षेत्रात देशसेवा करणार्या सर्वांचा आपल्याला आदर आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक हीच सामाजिक जाणीव जपून दरवर्षी एक राखी जवानांसाठी पाठवत असतात.असंख्य महिला भगिनी आपल्या देश सीमेवर लढणार्या सैनिक भावासाठी पुढे येत राखी पाठवतात.अनेक उत्सवाला देशाची सुरक्षा म्हणून घरी न येता सीमेवर उभे असणारे सैनिक यांचा त्याग मोठा आहे.त्यांना आपण नागरिक म्हणून प्रेरणा देण्याची गरज आहे.आम्ही सर्व आपल्या सोबत आहेत आणि तुमच्या राष्ट्रनिष्ठेची आम्हाला जाणीव आहे या भावनेने राख्या पाठविल्या जात असून महिला भगिनींनी मोठ्या संख्येत राख्या जमा कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले. स्थानिक बाजारपेठेत राख्या खरेदी करून सौ.रेणुका कोल्हे यांनी ऑनलाईन खरेदी टाळून आपल्याच स्थानिक दुकानात खरेदी करा असे आवाहन केले. त्यामुळे बाजारपेठेला हातभार लागतो आणि लहान दुकानदारांचा देखील सण गोड होण्यास मदत होते अशी भावना व्यक्त केली असून नागरीकांनी मोठ्या संख्येने स्थानिक बाजारपेठेला महत्व देण्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बाळासाहेब नरोडे, संजय होन, भाजप शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे, गोपीनाथ गायकवाड, विद्या सोनवणे, लक्ष्मी होन, उषा होन, अनिता गाडे, वैशाली साबळे, शुभांगी लहारे, रुपाली नेटारे, अपूर्वा डोखे, सरला नेटारे, किरण सूर्यवंशी, जयप्रकाश आव्हाड, साई नरोडे, रोहित कणगरे, सतीश रानोडे, खालीकभाई कुरेशी, फकीर महमंद पहिलवान, रोहन दरपेल, अमोल बागुल, सुजल चंदनशिव, अभिजित मंडलिक, अजय शार्दुल आदींसह युवा सेवक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
COMMENTS