Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालकांचे समुपदेशन होण्यासाठी प्राथमिक शिक्षकांवर महत्त्वाची जबाबदारी-अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश खोचे

अंबाजोगाई प्रतिनिधी - ओळख स्पर्शाची (गुड टच-बॅड टच) या विषयावर कविता नेरकर यांनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात तालुक्यातील 165 शाळेतील शिक्षक व श

अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यासाठी बालविकास प्रकल्पवर मोर्चा
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन जाधव-पाटील; उपाध्यक्षपदी अनिल देसाई बिनविरोध
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीला आज सुनावणार शिक्षा

अंबाजोगाई प्रतिनिधी – ओळख स्पर्शाची (गुड टच-बॅड टच) या विषयावर कविता नेरकर यांनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात तालुक्यातील 165 शाळेतील शिक्षक व शिक्षका यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश, अंबाजोगाई खोचे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेस प्रमुख पाहुण्या म्हणून अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाजोगाई घरत या उपस्थित होत्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, गटशिक्षणाधिकारी शेख व ज्ञानप्रबोधिनी शाखा अंबाजोगाई येथील प्रतिभा अष्टपुत्रे, तिलोत्तमा पतकराव यांची उपस्थिती होती. तसेच या मान्यवरांनी मार्गदर्शन ही केले. समाजामध्ये दिवसेंदिवस बालकांचे लैंगिक शोषणाचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील महत्त्वाचा घटक असणार्या शिक्षकांना योग्य व कायदेशीर माहिती मिळावी, त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षित करणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाजोगाईचे खोचे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजातील या राक्षसी प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढले तर या लहान उमलणार्या कळ्या कोमेजून जाणार नाहीत या कार्यासाठी प्राथमिक शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. यावेळी अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाजोगाईच्या घरत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मला असा अनुभव आला आहे की, काही दिवसांपूर्वी (पोक्सो) विशेष न्यायाधीश असताना एका दहा वर्षाच्या मुलीला शेजारी राहणार्या काकाने अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यामुळे ती मुलगी काही दिवस शाळेत एकटीच व निरागसपणे बसत होती. काही दिवसानंतर तिच्यावर अत्याचाराचे प्रमाण वाढले व नंतर तिने आत्महत्या केली. या दरम्यान शिक्षकांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारले असते तर ती मुलगी आज आपल्यातून गेली नसती. या विषयातून त्यांनी सांगितले की, शिक्षकांनी जर लक्ष दिलं तर कितीतरी मुलांवर अत्याचार होण्यापासून ते रोखू शकतात. यावेळी अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर म्हणाल्या की, आपल्या लहान मुलींना व मुलांना योग्य वयात योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे. ज्यावेळेस ऊस तोडणीसाठी लोक बाहेरगावी जातात. त्यावेळेस वाडी, वस्तीवर, तांड्यावर लहान मुलांचे शोषण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. अशावेळी आपण शिक्षक म्हणून खूप मोठी जबाबदारी पार पाडत असतो. एखादी गोष्ट छोटी असतानाच शिक्षकांनी पालकांना व मुलांना योग्य पद्धतीने समजावून सांगितली तर भविष्यात होणारे मोठ-मोठे गुन्हे ही टाळता येतीलव एखाद्या लहान बालकाचे आयुष्याचे वाटोळे होण्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो. त्याचबरोबर दैनंदिन काम करित असताना आलेले अनुभव सांगितले की, लहान मुलांवर समाजातील लोक कशाप्रकारे अत्याचार करतात. त्यामध्ये जवळच्या नात्यातील ही लोक असू शकतात, असे अनुभव आम्हाला पहावयास आलेले आहेत, हे उदाहरणासहित त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो) या कायद्याविषयी शिक्षकांना सविस्तर माहिती सांगितली व आपल्या शाळेतील मुलींना दामिनी पथक त्याचबरोबर डायल 112 यासंबंधी माहिती देऊन जागृत करावे असे सांगितले. ज्ञान प्रबोधनी शाखा अंबाजोगाई यांच्या अष्टपुत्रे व पतकराव यांनीही लहान मुलांच्या संदर्भात शिक्षकांची व आई-वडिलांची जबाबदारी याविषयी चित्रफितीद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी अंबाजोगाई विभागातील महिला पोलीस कर्मचार्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राठोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार महिला पोलीस उपनिरीक्षक शेटे यांनी मानले.

COMMENTS