Homeताज्या बातम्यादेश

बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळली; ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - काही दिवसांपूर्वी ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळण्याची दुर्दैवी घटना स

पोलिसांच्या गाडीने चौघांना चिरडले; एकाचा मृत्यू
तळेगाव ढमढेरेजवळील अपघातात तिघांचा मृत्यू
राष्ट्रीय महामार्ग 361 फ खरवंडी ते नवगण राजुरी वर ब्रम्हनाथ येळम शिवारात भीषण अपघात एक जण जागीच ठार

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – काही दिवसांपूर्वी ठाण्यातील बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळण्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. या दुर्घटनेत ६ कामगारांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशात लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना समोर आली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. शहरात बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधल्या जात असलेल्या आम्रपाली ड्रीम व्हॅलीत ही दुर्घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले चार मजूर हे बिहारमधील विभूतीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील किशनपूर ताभका गावातील एकाच परिसरातील रहिवासी होते.

COMMENTS