छ. संभाजीनगर : आईसाठी आपले मुल म्हणजे सर्वस्व असते. त्यासाठी ती काहीही करायला तयार होते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आईकडूनच आपल्या पोटच्या
छ. संभाजीनगर : आईसाठी आपले मुल म्हणजे सर्वस्व असते. त्यासाठी ती काहीही करायला तयार होते. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आईकडूनच आपल्या पोटच्या मुलीलाच जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. एका आईने अंधश्रद्धेतून आपल्या मुलीवर ती झोपली असतांना तिच्यावर रॉकेल टाकून तिला पेटवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
आईच्या एका मैत्रिणीने तिला असे केल्यास धनलाभ होईल, असे सांगितल्याने आईने हे पाऊल उचलल्याचे तपासात उघड झाले आहे. जखमी मुलगी ही तशीच पळत जाऊन पोलिस ठाण्यात गेली. यानंतर पोलिसांनी तिला दवाखान्यात भरती करत तिच्यावर उपचार केले. पार्वती दादासाहेब हुलमुख (वय 40, रा. गल्ली क्र. फुलेनगर, आंबेडकरनगर) असे आरोपी महिलेच नाव आहे. तर सुप्रिया दादासाहेब हुलमुख (वय 20) असे जखमी मुलीचे नाव आहे. शंकुतला आहेर (रा. मिसरवाडी) यांनी मुलीला पेटवण्याचा सल्ला दिल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सुप्रिया हुलमुख हिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. यानंतर ती तिच्या आई आणि भावासोबत फुलेनगरमध्ये येथे राहत होती. सुप्रिया ही काम करत शिक्षण घेते. तिची आई ही अंधश्रद्धेला बळी पडली होती. आईच्या मैत्रिणीने मुलीला जाळल्यास पैसे मिळतील असे सांगितले. त्यानुसार 17 ऑगस्टला सुप्रिया ही घरी काम करून परतली. तसेच जेवण करून झोपली असता, पहाटे 4.30 ला तिच्या आईने तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवले. दरम्यान, तिला चटके जाणवू लागल्याने ती जागी झाली झाली. तिला आईच्या ज्वाळा दिसल्या. आई जवळच उभी होती. तसेच तिच्या हातात पेट्रोलची बाटली होती. आगीमुळे सावित्री ही जळत असल्याने तिच्या भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेत सुप्रिया ही गंभीर भाजली आहे. तीचे केस जळाले असून खांद्यासह शरीरावर जखमा झाल्या आहेत. दरम्यान, तिच्या आईने धमकावल्याने तिने पाच दिवस या वेदना सहन केल्या. दरम्यान, आई घरा बाहेर गेल्याची संधी साधताच तिने सिडको ठाणे गाठत तिच्यावर बेतलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी याची दखल घेत आई आणि तिच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. शकुंतला हिने सुप्रियाची आईला ’तू जर मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल. तसेच तुझ्या मुलाचे चांगले होईल,’ असे संगील्याने तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले
COMMENTS