Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परजिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी पशुधनाच्या लसीकरणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

सातारा / प्रतिनिधी : जिल्ह्यात ऊस कारखाना गळीत हंगामासाठी परजिल्ह्यातून ऊस तोडणी कामगार त्यांचे पशुधनासह कारखानास्थळी स्थलांतरीत होत असतात. काही कारख

जुनच्या मध्यावर पाणी परिषदेचे आयोजन : डॉ. भारत पाटणकर
वनश्री महाडीक मल्टीस्टेट सोसायटीला 56 लाखांचा नफा : राहुल महाडीक
कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करा : खा. श्रीनिवास पाटील

सातारा / प्रतिनिधी : जिल्ह्यात ऊस कारखाना गळीत हंगामासाठी परजिल्ह्यातून ऊस तोडणी कामगार त्यांचे पशुधनासह कारखानास्थळी स्थलांतरीत होत असतात. काही कारखान्याच्या ठिकाणी ऊस वाहतूकीसाठी बैलगाडींचा वापर केला जातो. अशावेळी वाहतूकीचे बैल व इतर पशुधन हे स्थलांतरीत कुटुंबासह येत असतात. तरी लंपी चर्म रोगाचे प्रतिबंध व नियंत्रण होण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या ठिकाणी ऊस तोड कामगारांचे कुटुंबासोबत येणारे ज्या पशुधनास लंपी चर्म रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण झाले नाही अशा पशुधनास लसीकरण करुन घेण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
ज्या पशुधनास लंपी चर्म रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे. अशा पशुधनाचे कुटुंबांनी स्थलांतरीत होण्यापूर्वी ज्या ठिकाणी लसीकरण केले आहे. तेथील पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील.
सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, जावली व वाई असे 10 तालुक्यातील 148 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 3817 व 482 बैल असे एकूण 4299 जनावरांना लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज रोजी जिल्ह्यात 10 जनावरांचा मृत्यू झाला. आजअखेर 201 गायी व 65 बैल असे एकूण 266 पशुधन मृत झाले आहे. आजअखेर 1483 गाई व 93 बैल असे एकूण 1576 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.

COMMENTS