Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसींच्या मागण्यांसाठी शनिवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

मुंबई ः ओबीसी आरक्षणावर गदा येवू नये यासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी आपले सहकारी नवनाथ वाघमारे याच्यासह आमरण उपोषण केले होते. दहा दिवसांनंतर राज्

महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात भूकंप  
दिल्लीत गॅंगवॉर भडकले… भरदिवसा कोर्टात कुख्यात गुन्हेगाराचा एन्काउंटर
चंद्रकांतदादा या प्रकरणात पडू नका,नाही तर तुमचेही कपडे फाटतील | LOKNews24

मुंबई ः ओबीसी आरक्षणावर गदा येवू नये यासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी आपले सहकारी नवनाथ वाघमारे याच्यासह आमरण उपोषण केले होते. दहा दिवसांनंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर हाके यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. तर दुसरीकडे मराठा समाज देखील सगे-सोयर्‍यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अखेर ओबीसींच्या मागण्यांसाठी शनिवारी 29 जून रोजी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या बैठकीचे आयोन करण्यात आले आहे.
अधिवेशनाला गुरूवारपासून सुरूवात झाली असून, 29 जून रोजी ओबीसी समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीतील सर्वच पक्षांच्या भूमिकेकडे आता राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे. या सर्वपक्षीय बैठकीसाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांना बोलवण्यात आले आहे. तसेच राज्यातील ओबीसी नेते आणि प्रमुख संघटनांच्या पदाधिकार्‍यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडताना आपल्या विविध मागण्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर ठेवल्या होत्या. त्या सर्व मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचे मत ऐकल्यानंतर राज्य सरकार त्यांची भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलनादरम्यान देखील अशाच प्रकारची सर्वक्षीय बैठक राज्य सरकारच्या वतीने बोलावण्यात आली होती. त्यामुळे या सर्वपक्षीय बैठकीत काय निर्णय घेतला जातो, यावर ओबीसींचे आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी अवास्तव केलेल्या मागण्यांमुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मनोज जरांगे उपोषण करत असलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळ वडीगोद्री येथे त्यांच्या विरोधातच उपोषण सुरू केले होते. सरकारच्या वतीने आश्‍वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र या आंदोलनादरम्यान राज्यातील विविध शहरामध्ये ओबीसी बांधव रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे ओबीसी आंदोलनाची धार वाढली होती.

COMMENTS