कोपरगाव प्रतिनिधी - तालुक्यातील पुर्व भागातील पढेगावची ग्रामसभा गुरुवार (ता.३१) रोजी सरपंच मिनाताई शिंदे यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरण
कोपरगाव प्रतिनिधी – तालुक्यातील पुर्व भागातील पढेगावची ग्रामसभा गुरुवार (ता.३१) रोजी सरपंच मिनाताई शिंदे यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.मात्र या ग्रामसभेत नागरीकांनी प्रशासनाच्या उणिवांचा लेखाजोखा मांडल्यामुळे प्रशासकीय कर्मचारी काहीतरी करु मार्ग काढु अशे सांगुन सध्यातरी त्यांनी वेळ निभावुन नेल्याची चर्चा आहे.
विजेच्या लपंडावामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना एक दिवस अगोदर घेराव घालुन वरीष्ठांना निवेदन दिले होते.त्यामुळे उप कार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड प्रत्यक्ष ग्रामसभेला हजर राहिले आणि विज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासित करुन गावाच्या बाहेरही गेले नसतिल तोच दिवस आणि रात्रभर विजेचा लपंडाव गावकऱ्यांनी अनुभवल्यामुळे त्यांच्या आश्वासनाचा गावापुढे निश्चितच फुसका बार ठरला आहे.अतिवृष्टीच्या याद्या सोशल मिडीयावर झाल्या मात्र त्याबाबत कृषी सहायक आणि तलाठी कार्यालयाने कानावर हात ठेवल्यामुळे तेदेखील त्यापासुन अनभिज्ञच असल्याचे उघड झाले.पिके पावसाअभावी करपली मात्र अद्याप पंचनाम्याचे आदेश नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
ग्रामपंचायत जल जिवन मिशन योजने अंतर्गत हर घर नल योजना राबवणार आहे.मात्र पाण्याचा पक्का स्रोत नसल्याने कशी योजना राबविणार ?हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.आरोग्य उपकेंद्र केवळ थंडी तापाच्या गोळ्या देते मात्र तिथे खोकल्याचे औषधच उपलब्ध होत नसल्यामुळे आता नागरीकांनीच स्वखर्चाने खोकला घालवण्यासाठी जवळ सुंठ बाळगण्याची गरज आहे.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हजर झालेपासुन वादाच्या भोवऱ्यात आहे.शाळा व्यवस्थापन समिती निवडीत त्यांनी निवडणूकीचा धडा गिरवल्यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला.मात्र या निवडीत शासननिर्णयाचा भंग झाला असेल तर व्यवस्थापन समिती बरखास्त करुन मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याच्या मागणीनेही चांगलाच जोर धरला होता.इतर विकास कामांवरही खेळीमेळीच्या वातावरणात आणि शांततेत ग्रामसभा पार पडली .कामगार तलाठी वगळता सर्व शासकीय कर्मचारी आणि बहुसंख्य नागरीक ग्रामसभेसाठी उपस्थित होते.
हास्यास्पद ग्रामसभा – ग्रामसभा नागरीकांना समस्या मांडण्याचे मोठे व्यासपीठ असुन त्या समस्यांचे तत्काळ निवारण करण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची असते.मात्र नळ देणार पण पाणी नाही,दवाखाना आहे पण औषध नाही,विज देतो म्हणताच बत्ती गुल, अतिवृष्टी भरपाई ची यादी घरा-घरात मात्र संबंधितांना ती माहीतच नाही.शाळेत निवडणुकीचा घाट नेमका कशासाठी?निष्कर्ष इतकाच की,या ग्रामसभेत समस्यांचे निराकरण एका बाजुलाच राहिल्यामुळे ती हास्यास्पद ठरली आहे.
COMMENTS