Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात

नंदुरबार प्रतिनिधी - हृदयात धडकी भरवणारा अपघात आज नंदुरबार जिल्ह्यात घडला. तब्बल १३ गरोदर मातांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला नंदुरबार जिल्

मोटारसायकलच्या धडकेतचिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू
स्कूल बस आणि गाडीचा अपघात.
भीषण अपघात ! चिमुकल्या मुलीचा मृत्यू

नंदुरबार प्रतिनिधी – हृदयात धडकी भरवणारा अपघात आज नंदुरबार जिल्ह्यात घडला. तब्बल १३ गरोदर मातांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा लोणखेडेजवळ अपघात झाला. पण दैव बलवत्तर म्हणून या अपघातातील रुग्णवाहिकेत असलेल्या गरोदर महिला थोडक्यात बचावल्या आहेत. गरोदर मातांना घेऊन जाणारी ही रुग्णवाहिका शहादा येथील लोणखेडा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अचानक पलटी झाली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरोदर महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी आणण्यात आले होते.

त्यानंतर पुन्हा या महिलांना घेऊन जात असताना लोणखेडा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे १३ गरोदर माता असलेली ही रुग्णवाहिका अचानक पलटी झाली. सदर रुग्णवाहिकेचा भरधाव वेग असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघातात गरोदर माता आणि रुग्णवाहिका चालक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर अपघाताची माहिती जिल्ह्याचे आमदार राजेश पाडवी यांना मिळताच त्यांनी त्यांच्या खासगी रुग्णवाहिकेतून सर्व जखमी महिला आणि रुग्णवाहिका चालकाला शहादा येथे असलेल्या नगर पालिकेच्या शासकीय रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले. अपघातातील सर्व गरोदर महिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातानंतर शहादा पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे. तसेच या अपघाताची नोंद देखील शहादा पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. परिणामी, या घटनेनंतर पुन्हा एकदा बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. तर रुग्णवाहिका चालकाला नेमकी अशी कोणती घाई होती की त्याने वेग मर्यादा न पाळता वाहन चालवले, असा प्रश्न अपघातातील गरोदर महिलांच्या कुटुंबियांकडून विचारण्यात येत आहे.

COMMENTS